मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-211

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 10:23:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-211
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  या  चारोळीतून  त्या  दोन प्रेमी जीवांच्या  प्रेमास  कोण  कोण  जबाबदार  आहेत , आणि  त्यांच्या  प्रेमाची  परिणती  काय  होते  यांची  उत्तम  उदाहरणे  देत  आहे . निसर्ग  आणि  ईश्वर  या  दोहोंची  सांगड  त्याने  या  प्रेम-चारोळीत  घालून  दिली  आहे .

===========================
💝 "तुझी नी माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती..
मी वात तर तु पणती,
हृदयात आहे तुझी मुर्ती..
आपल्या कुंडलीत फळाची आहे युती
नवसाला पावेल गणपती....
जपल्या आहेत तुझ्या स्मृती..
स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी ....
हे ह्रदय तुलाच साद घातली आपण दोघे माणिक मोती ....
नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कंठ फुटती ....
डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती..
नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती..,
तुला पाहून मनात कमळे फुलती..💘
===========================

--नवं-चारोळीकार
----------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================