मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-124-माझा देश भारत

Started by Atul Kaviraje, February 14, 2023, 10:36:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-124
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा देश भारत"

     भारत आज लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमंकाचा देश आहे. भारताची लोकसंख्या 135 कोटी पेक्षा जास्त आहे. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि इतर सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. वर्तमान काळात भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील 70% लोकसंख्या गावामध्ये राहते. प्रत्येक भारतीयाप्रमाणे मला देखील माझा देश खूप आवडतो.

     भारत हा तीनही दिशांनी समुद्राने वेढलेला आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारत आपली संस्कृती आणि सभ्यतेसाठी विश्र्वभरात ओळखला जातो. भारतातील 77% लोकसंख्या हिंदू आहे. भारताला इंग्रजीत इंडिया म्हंटले जाते. इंडिया हे नाव सिंधू नदीवरून ठेवण्यात आलेले आहे.

     भारतात खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात. मराठी, नेपाळी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, बंगाली, हिंदी, काश्मिरी, मणिपुरी, उडिया यासारख्या 20 पेक्षा जास्त प्रमुख भाषा भारतात बोलल्या जातात. भारताच्या शेजारी पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, चीन, मलेशिया, श्रीलंका ई. देश आहेत. भारतातील ताजमहल हे जगातील सात आश्चर्यामध्ये समाविष्ट आहे. या शिवाय भारतात अनेक ऐतिहासिक आणि सुंदर पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी लाखों विदेशी लोक भारतात येतात. भारतात मोठ मोठी प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांची वस्तु कला आणि सौन्दर्य अनुभवण्यासाठी भारतसह जगभरातील लोक येतात.

     भारताचे राष्ट्र गीत 'जन गण मन' आहे ज्याला रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् आहे ज्याला बकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. भारताचा झेंडा तीन रंगांनी बनलेला आहे. ज्यात केशरी, पांढरा आणि हिरवा समाविष्ट आहेत. तिरंग्याच्या मधोमध 24 आरे असलेले अशोक चक्र आहे. भारत एक लोकशाही देश आहे. आपल्या देशात जनतेद्वारे निवडलेले प्रतिनिधी देश चालवतात. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतात कोणत्याही धर्माचे लोक राहू शकतात. आपल्या देशात सर्वांना समान अधिकार आहे.

     इतकी विविधता असताना देखील भारतीयांमध्ये आपापसातील प्रेम आणि बंधुत्वाची भावना कायम आहे. वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा असतांनाही एकामेकांसोबत न भांडत प्रत्येक धर्माचा सन्मान करणे आपली भारतीय संस्कृति शिकवते आणि हेच अनेकतेत एकतेचे प्रतीक आहे. खरोखर आपला भारत देश महान आहे. व प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटला पाहिजे. जय हिंद.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================