का कोणास ठाऊक

Started by Aditya Dange, February 15, 2023, 07:53:34 PM

Previous topic - Next topic

Aditya Dange

का कोणास ठाऊक

का कोणास ठाऊक कधी कधी सार सोडून दूर निघुन जावसे वाटते. का कोणास ठाऊक या दाटलेल्या आयुष्यात थोड़ी विश्रांति घ्यावीसी वाटते. का कोणास ठाऊक आपलीच माणसे नकोशी वाटतात. का कोणास ठाऊक एकटे पणा आवडू लागतो.
का कोणास ठाऊक माहीत असते सारे   पण मनाला समजवायचे नसते.
का कोणास ठाऊक मन मोकळे रडावेसे वाटते. का कोणास ठाऊक यालाच आयुष्य म्हणावे लागते यालाच आयुष्य म्हणावे लागते.

आदित्य डांगे