प्रेमगीत-सौंदर्य तुझं डोळ्यांनी प्यावंसं वाटतंय,आज तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय

Started by Atul Kaviraje, February 15, 2023, 11:18:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई हमसे ना हो जाये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही बुधवार-रजनी आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई हमसे ना हो जाये)
------------------------------------------------------------------------

        "सौंदर्य तुझं डोळ्यांनी प्यावंसं वाटतंय, आज तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय !"
       ------------------------------------------------------------------

सौंदर्य तुझं डोळ्यांनी प्यावंसं वाटतंय,
आज तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय !

सौंदर्य तुझं डोळ्यांनी प्यावंसं वाटतंय,
आज तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय !
साक्षात स्वर्गाची मेनका तू जणू,
तुझ्या रूपाचं बखान करावंसं वाटतंय !

सौंदर्य तुझं डोळ्यांनी प्यावंसं वाटतंय,
आज तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय !
चंद्राची चांदणी, रूपाची खाणंच तू जणू,
तुझं आरस्पानी लावण्य पाहावसच वाटतंय !

ये प्रिये, रात्र कशी सजली आहे
ये प्रिये, सम्यात ती बांधली आहे
रात्रीची नशा गात्रागात्रात भिनते आहे,
त्यात तुझी भिनि भिनि खुशबू बेभान करते आहे.

जणू हा मौसम मदिरासक्त झालाय
जणू तो अधिकच पिऊन बहकू लागलाय 
आपल्यासोबत तो सर्वांनाही पाजत आहे,
आपल्यासोबत तो साऱ्यांनाच धुंद करीत आहे.

नयन तुझ्यावर आसक्त होताहेत
तुझ्या रूपाचे रसपान करू पाहताहेत
तुला पाहण्या ते इतके बेचैन आहेत,
सतत तुझ्याकडेच ते ओढ घेताहेत.

चातकाला जणू पावसाची ओढ आहे
प्रवाहाला जणू किनाऱ्याची ओढ आहे
तद्वत मीही तुझ्या प्रेमाच्या ओढीने,
तुझ्या जवळ ओढला जात आहे.

लोकांना  काय जातंय सांगायला
ते नेहमीच प्रेमाच्या आड येतात
जमाना तर नेहमीच विरुद्ध असतो,
प्रेमातला भाव त्यांना कळतं नसतो.

पण त्यांचं कोण ऐकतंय, प्रिये
मी नेहमी माझ्या मनाचच ऐकतो
लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून,
मी माझ्या मनाचच खरं करतो.

आता अधिक उशीर लावू नकोस, प्रिये
पहा ही रात्र सरत चालली आहे
आता जीवाला घोर लावू नकोस, प्रिये,
पहा ही निशा ढळत चालली आहे.

आज फक्त मी आणि तूच आहोत
आपलं मन आणि आपलं प्रेम आहे
एकत्र येण्यापासून कुणी परावृत्त करीत नाही ना ?
आपण एकत्र येण्याची काही चूक करत नाही ना ?

सौंदर्य तुझं डोळ्यांनी प्यावंसं वाटतंय,
आज तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय !

सौंदर्य तुझं डोळ्यांनी प्यावंसं वाटतंय,
आज तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय !
साक्षात स्वर्गाची मेनका तू जणू,
तुझ्या रूपाचं बखान करावंसं वाटतंय !

सौंदर्य तुझं डोळ्यांनी प्यावंसं वाटतंय,
आज तुझ्यावर प्रेम करावंसं वाटतंय !
चंद्राची चांदणी, रूपाची खाणंच तू जणू,
तुझं आरस्पानी लावण्य पाहावसच वाटतंय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.02.2023-बुधवार.
=========================================