प्रेम कविता-गीत-तुझ्या प्रतीक्षेत आहे मी राणी, लिहीत आहे मी प्रेम कहाणी !

Started by Atul Kaviraje, February 16, 2023, 05:58:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, आई रुत मस्तानी कब आयेगी तू"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सांज-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, आई रुत मस्तानी कब आयेगी तू)
------------------------------------------------------------------------

                  "तुझ्या प्रतीक्षेत आहे मी राणी, लिहीत आहे मी प्रेम कहाणी !"
                 -----------------------------------------------------

तुझ्या प्रतीक्षेत आहे मी राणी,
लिहीत आहे मी प्रेम कहाणी !💖

तुझ्या प्रतीक्षेत आहे मी राणी,
लिहीत आहे मी प्रेम कहाणी !❤
वाटेकडे तुझ्या नयन लागले,
झुरवू नकोस तू, ये तत्क्षणी !

तुझ्या प्रतीक्षेत आहे मी राणी,
लिहीत आहे मी प्रेम कहाणी !💕
तू हवीसच, तू असावीसच,
तुझ्याविण राहील अधुरी कहाणी !

बघ बहर बहरुन आलेत
बघ, ऋतू मोहरून चाललेत
बघ, सारेच वाट पाहताहेत तुझी,
तू आहेस माझी ऋतू राणी !

माझ्या स्वप्नातली सुंदरी तू
माझ्या स्वप्नांची परीच तू
तुझ्यापुढे रीत्याच ठरतील ग,
या भूलोकीच्या साऱ्या सौंदर्य खाणी !

हे जीवन असंच होतंय व्यतीत
हे जीवन अपूर्ण होतंय प्रतीत
कधी येशील माझ्या जीवनात तू ?
कधी होशील माझ्या घरची तू बहू-राणी ?

कळ्यांसारखी तू खिदळत ये
फुलांसारखी तू फुलत ये🌹
आता जास्त दूर राहू नकोस,
ये धावत, तू ये साजणी !

तुझ्यावाचून मला चैन नाही
तुझ्यावाचून जीवाला आराम नाही
आता तडपवू नकोस अजून,
आता अडवू नकोस आणि !

प्रेमाची कळी बघ कशी फुलतेय🌹
फुलता फुलता मला विचारतेय
कुठे आहे तुझी प्रिया ?
बाग वाटतेय तिच्याविना सुनी !😒

तुझ्याविना महफिल आहे भकास
तुझ्याविना साज आहेत उदास😒
विचारतेय, रंग कधी भरणार येऊन ?
गाणार कधी ती प्रेमाची गाणी ?

या हृदयाचा काय भरोसा ?❤
या आशिक दिलाचI काय भरोसा ?💖
तू आलीस तर ठीक,
नाहीतर वाट पाहताहेत कितीतरी जणी !

मग राहशील तू पस्तावत
मग बसशील तू पच्छाताप करत
मग राहशील तू डोळे पुसत,😂
मग कुरवाळीत राहशील त्याच त्याच आठवणी !

काळजी नको करुस साजणी
माझ्या हृदयाची फक्त तूच आहेस राणी
तूच नायिका, तूच आहेस प्रेमिका,
लिहीत आहे मी आपली प्रेम-कहाणी !

तुझ्या प्रतीक्षेत आहे मी राणी,
लिहीत आहे मी प्रेम कहाणी !💖

तुझ्या प्रतीक्षेत आहे मी राणी,
लिहीत आहे मी प्रेम कहाणी !❤
वाटेकडे तुझ्या नयन लागले,
झुरवू नकोस तू, ये तत्क्षणी !

तुझ्या प्रतीक्षेत आहे मी राणी,
लिहीत आहे मी प्रेम कहाणी !💕
तू हवीसच, तू असावीसच,
तुझ्याविण राहील अधुरी कहाणी !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.02.2023-गुरुवार.
=========================================