प्रेम कविता-गीत-प्रिये, भवरा कसा गुणगुणतोय, कळ्यांना गुंजारवाने कसा खेळवतोय !

Started by Atul Kaviraje, February 17, 2023, 04:14:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "गुनगुना रहे हैं भँवरे, खिल रही है कली कली"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही शुक्रवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(गुनगुना रहे हैं भँवरे, खिल रही है कली कली)
-------------------------------------------------------

          "प्रिये, भवरा कसा गुणगुणतोय, कळ्यांना गुंजारवाने कसा खेळवतोय !"
         -------------------------------------------------------------

प्रिये, भवरा कसा गुणगुणतोय,
कळ्यांना गुंजारवाने कसा खेळवतोय !

प्रिये, भवरा कसा गुणगुणतोय,
कळ्यांना गुंजारवाने कसा खेळवतोय !
प्रत्येक कळीपाशी जाऊन, गुणगुण करून,
त्यांना प्रेमाने कसा फुलवतोय !🌹

प्रिये, भवरा कसा गुणगुणतोय,
कळ्यांना गुंजारवाने कसा खेळवतोय !
कोमेजू लागलेल्या कळ्यांना तो,
पूर्ण फुलाचे रूप देतोय !🌹

लाजेचा घुंगट ओढून घेताहेत कळ्या
पानांच्या आड लपून राहताहेत कळ्या
त्या लबाड भुंग्यापासून सावध होताहेत कळ्या,
त्यांचा मधुरस तो शोषून घेतोय !

हा ऋतूच असा आहे प्रिये
प्रेमी जनांना तो प्रेमात पाडतोय💕
हा बहरच असा आहे प्रिये,
प्रेमाला तो झुलवतोय, फुलवतोय !

बघ, आपणही दोघे जवळ येतोय
बघ, आपणही दोघे प्रेमात पडतोय💖
एकमेकांच्या डोळ्यांत हरवून आपण,
मनातले प्रेम एकमेकांना सांगतोय !👍

आजवर खूप इच्छा मनातच होत्या
पुष्कळ मनोरथांना आकारचं नव्हता
या इच्छा आता होतील पूर्ण, लवकरच,
हा हसरा, खेळकर, वाहता वारा म्हणतोय !

     पहा, प्रिया मी तुझे सारे बहाणे ओळखते
     पहा, प्रिया मी तुझ्या मनीचे गुज जाणते
     आता अति लगट करणं सोड,
     पहा, हे जग कसं चोरून  पहाते !

     तुही त्या भुंग्यासारखाच वागतोयस आज
     कळ्यांभोवती तुझा गुंजारव सुरु आहे आज
     आता काहीच बोलू नकोस, तुझी गुणगुण थांबव,
     प्रेमाचे तुझे हे अति गुणगान थांबव.

     तो लबाड भुंगा आणि तू एकच आहात
     कळ्यांना भंडावून सोडण्यास नुसते टपले आहात
     मी जाणतेय तुझे मनोरथ, महिताहे मला,
     तुझ्या प्रेमाचा आणि एक बहाणा, छळतोय मला.

प्रिये, बरोबर ओळखलंस मला तू
प्रिये, खरोखर ओळखलंस मला तू
अगं, तुझ्या प्रेमात वेडा झालेला मी एक भुंगा,
तुझ्या सौंदर्याने पागल झालेला मी तुझा पतंगा.

प्रिये, भवरा कसा गुणगुणतोय,
कळ्यांना गुंजारवाने कसा खेळवतोय !

प्रिये, भवरा कसा गुणगुणतोय,
कळ्यांना गुंजारवाने कसा खेळवतोय !
प्रत्येक कळीपाशी जाऊन, गुणगुण करून,
त्यांना प्रेमाने कसा फुलवतोय !🌹

प्रिये, भवरा कसा गुणगुणतोय,
कळ्यांना गुंजारवाने कसा खेळवतोय !
कोमेजू लागलेल्या कळ्यांना तो,
पूर्ण फुलाचे रूप देतोय !🌹

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.02.2023-शुक्रवार.
=========================================