प्रेम कविता-गीत-बाग कशी डोलतेय आनंदाने, कळ्या हसताहेत पहा हर्षाने !

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 12:13:23 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, प्रेम कविता-गीत ऐकवितो. "बागों में बहार है, कलियों पे निखार है, तुमको मुझसे प्यार है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही शनिवार-मध्यरात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(बागों में बहार है, कलियों पे निखार है, तुमको मुझसे प्यार है)
--------------------------------------------------------------------

                "बाग कशी डोलतेय आनंदाने, कळ्या हसताहेत पहा हर्षाने !"
               -----------------------------------------------------

बाग कशी डोलतेय आनंदाने,
कळ्या हसताहेत पहा हर्षाने !

बाग कशी डोलतेय आनंदाने,
कळ्या हसताहेत पहा हर्षाने !
बहर आलाय, बहर रुजलाय,
रंगीबेरंगी फुलांना फुलवीत नेमाने !🌹

बाग कशी डोलतेय आनंदाने,
कळ्या हसताहेत पहा हर्षाने !
मंद वाऱ्याच्या झुळुकीने झुलताहेत,
वाऱ्याशी हितगुज करताहेत प्रेमाने !

अशीच माझ्या आयुष्यात ये, प्रिये
त्या कळ्यांसारखीच झुलत रहा
प्रेमाच्या माझ्या स्वीकार करून,💖
अशीच हर्षाने फुलत रहा.

     साजणा, नाही भुलणार मी तुझ्या मखलाशीला
     प्रिया, नाही बधणार मी तुझ्या गोड बोलण्याला
     असाच वागतोस, असाच गोड बोलून नेहमी,
     कमी करत नाहीस मोका साधून घ्यायला.

     मी तुला चांगलीच ओळखून आहे
     ही बाग, ह्या कळ्या, हा बहर नाममात्र आहे
     तुला फक्त माझी जवळीकच हवीय,
     तुला फक्त माझं सान्निध्यच हवं आहे.

     हा बहर मलाही खूप आवडतोय
     वृक्षराईंना पहा कसा तजेला देतोय
     कळ्यांना धुंद-फुंद करीत प्रेमाने,
     वाऱ्यासवे फुलांचा सुगंध दूर-दूर पसरवतोय. 🌹

     बस, आता पुरे झाला तुझा बहाणा
     हात सोडून दे माझा, हो तू शहाणा
     तुझ्या गोड बोलण्याने मी चुकणार नाही,
     तुझी मी कधीच, कधीच होणार नाही.

मला माहित आहे तुझ्या इन्कारIमध्येच इकरार आहे
मला ठाऊक आहे तुझ्या नकारामध्येच होकार आहे
तुझा हा नकार फक्त नावाला, वरवरचा आहे,
तुलाही माझ्याच प्रेमाचा आता आधार आहे.

     इथवर सर्व ठीक आहे, राजसा
     तुला वाटतंय सारं योग्य आहे, प्रिया
     पण तुझ्या मनात आहे ते नाही होणार,
     तुझ्या मनात आहे ते कधीच नाही घडणार.

तुझ्या तक्रारीतच तुझं प्रेम दडलंय❤
तुझ्या खोट्या रागातच अनुराग लपलाय
तुझं माझ्यावर खरोखरच प्रेम आहे, 💕
हे तुझं वागणं मला उगा बहकवत आहे.

आता सर्व सोड प्रिये, एक प्रेम-कहाणी लिहूया
कधीही न पाहिलेल्या प्रेमाची एक निशाणी होऊया
एकत्र आपण ती प्रेमाची अक्षरे गिरवूया,
सफल प्रेमाची सुफळ कथा जगापुढे ठेवूया.

तुझी बेचैनी मला कळतेय, प्रिये
मुखावर नसली तरी मनातून उमगतेय, प्रिये
आता उगीच बेकरार होऊ नकोस,
उगीच जीवाला घोर लावून नकोस.

तुझं प्रेम जाणतो मी, सखे👍
तूच माझी आहेस प्रेम-दिवाणी
तुझं मन ओळखतो मी, लाडके,
तूच आहेच माझ्या दिलाची राणी. 👌

बाग कशी डोलतेय आनंदाने,
कळ्या हसताहेत पहा हर्षाने !

बाग कशी डोलतेय आनंदाने,
कळ्या हसताहेत पहा हर्षाने !
बहर आलाय, बहर रुजलाय,
रंगीबेरंगी फुलांना फुलवीत नेमाने !🌹

अशीच माझ्या आयुष्यात ये, प्रिये
त्या कळ्यांसारखीच झुलत रहा
प्रेमाच्या माझ्या स्वीकार करून,
अशीच हर्षाने फुलत रहा. 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.02.2023-शनिवार.
=========================================