II ओम नमः शिवाय II-महाशिवरात्री-कविता-6-काव्यमय गोष्ट

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 11:07:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II ओम नमः शिवाय II 
                                       महाशिवरात्री
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार आहे. आज महाशिवरात्रीची पावन रात्र आहे. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. म्हणूनच दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीही साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्री याना महाशिवरात्रीच्या अनेक वंदनीय शुभेच्छा. वाचूया या महापर्वावर शिव शंकराच्या काही कविता.

                                     "काव्यमय गोष्ट"
                                    ---------------

बाळ पार्वतीचा

केळी नारळीचे बनं

पार्वती न्हायाच ठिकानं ।


पार्वती न्हायाला बसली

मळी अंगाची काढली ।


त्याचा पुतळा बनवला

राखण दारावर ठेवला ।


नाव गणपती ठेवले

बाळ दारात बसवले ।


शंकर तपेचे उठले

हाती त्रिशूळ घेतले ।


शंकर वाड्यापाशी आले

बाळ दंडवत त्यांना घाले ।


बाळ बोले शंकराला

कोण तुम्ही कसे आला ।


कोणी कोणा ओळखेना

बाळही हट्ट सोडेना ।


युध्द दोघाचे लागले

पार्वतीला ना कळले ।


कोणी कोणा आवरेना

बाळ दाखवीतो बाणा ।


राग शंकराला आला

त्रिशूळ फेकून मारला ।


मान बाळाची छाटली

पार्वती न्हाऊन उठली ।


बाळ कोणी हा मारला

जाब पुसे शंकराला ।

--विजय सानप
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार.
=========================================