II ओम नमः शिवाय II-महाशिवरात्री-शुभेच्छा संदेश-1

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 11:09:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II ओम नमः शिवाय II 
                                       महाशिवरात्री
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार आहे. आज महाशिवरात्रीची पावन रात्र आहे. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. म्हणूनच दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीही साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्री याना महाशिवरात्रीच्या अनेक वंदनीय शुभेच्छा. वाचूया महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

--लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा "हैप्पी महाशिवरात्री !

--ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये आहे सर्व संसार, ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात. महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा

--जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

--बेलाचे पान वाहतो महादेवाला, करतो वंदन दैवताला, सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला. महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

--काळ पण काही वाकड नाही करू शकत, जो आहे भोलेनाथचा भगत...॥ जय भोलेनाथ !शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

--"सर्व जग ज्याच्या शरणी आहे... त्या भगवान शंकराला नमन आहे, भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.. चला महा देवाला वाहूया श्रद्धेचं फूलं... . हर हर महादेव

--आज सकाळी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकेल. आपला दिवस संपूर्ण निष्ठेने साजरा करा. शुभेच्छा महाशिवरात्रि..!!

--कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारी तुजवीण शंभो मज कोण तारी महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

--मराठी भाषण व सूत्रसंचालन
--------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार.
=========================================