II ओम नमः शिवाय II-महाशिवरात्री-शुभेच्छा संदेश-2

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 11:10:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II ओम नमः शिवाय II 
                                        महाशिवरात्री
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार आहे. आज महाशिवरात्रीची पावन रात्र आहे. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. म्हणूनच दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीही साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्री याना महाशिवरात्रीच्या अनेक वंदनीय शुभेच्छा. वाचूया महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

--महादेवामुळेच संसार आणि महादेवामुळेच शक्ती आहे स्वर्ग सुख आणि आनंद महादेवाच्या भक्तीत आहे.महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

--"ॐ त्रियम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं! उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात् !! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!"

--महाकाल महाकाल नावाची किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप होतील सर्व कामं, बोला फक्त जय श्री महाकाल शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

--महाशिवरात्री आज या शुभदिनी आम्ही प्रार्थना करतो की आपल्या देशावर जे कोरोना च संकट आलं आहे ते लवकरात लवकर दूर होवो, आणि सगळ्याचं आयुष्यात सुख आणि समृद्धी भरून जावो कोणाला कसली कमी पडू नये, त्यांच्या आयुष्यात खूप सर आंनद येवो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो... महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

--दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

--शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची होवो एक नवी आणि चांगली सुरूवात, हीच शंकराकडे प्रार्थना...महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

--शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव भक्ती आहे,शिव शक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

--कारुण्य सिंधु भव दुःख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी...महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

--मराठी भाषण व सूत्रसंचालन
--------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार.
=========================================