II ओम नमः शिवाय II-महाशिवरात्री-शुभेच्छा संदेश-3

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 11:12:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II ओम नमः शिवाय II 
                                       महाशिवरात्री
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार आहे. आज महाशिवरात्रीची पावन रात्र आहे. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. म्हणूनच दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीही साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्री याना महाशिवरात्रीच्या अनेक वंदनीय शुभेच्छा. वाचूया महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌺 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

--दुःख दारिद्र्य नष्ट होवो, सुख समृद्धी दारी येवो, या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो...Happy Maha Shivratri !

--शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो... ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री

--अद्भूत आहे तुझी माया, अमरनाथमध्ये केला वास, नीळकंठाची तुझी छाया, तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव , महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

--कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी कारुण्यसिंधु भवदु:खहारी तुजवीण शंभो मज कोण तारी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

--शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...

--भगवान शंकर आले तुमच्या द्वारी आता येईल बहार तुमच्या द्वारी ना राहो आयुष्यात कोणते दुःख फक्त मिळो सुखच सुख.

--"संपूर्ण निश्चलता आणि "सर्वोच्च गती हे शिवाचे गुण आहेत. आणि हाच जीवन जगण्याचा सुद्धा मार्ग आहे" सद्गुरू

--"ही महाशिवरात्री तुम्हाला केवळ जागरणाची नव्हे तर जागृतीची रात्र होऊ द्यात हीच माझी इच्छा." - सद्गुरू

--मराठी भाषण व सूत्रसंचालन
--------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी भाषण.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार.
=========================================