मंथन

Started by madhura, September 09, 2010, 11:07:50 PM

Previous topic - Next topic

madhura

दिला नियतीने स्त्री जन्माला विपरीतसा हा शाप जुना

ठायी ठायी दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा

स्त्रीच्या भाळी सदाच लिहिले जहर तेच कडु चार

पचवून त्याला अमृत उधळी तीच माय हळुवार

माणसातल्या देवपणाचा होतो तेव्हा साक्षात्कार

हाती येते नवनीत जेव्हा मंथन होते अपरंपार


गीत    -    मंगेश कुळकर्णी
संगीत    -    अशोक पत्की
स्वर    -    देवकी पंडीत
       (शीर्षक गीत, मालिका: मंथन, वाहिनी: ई टीव्ही)