हर हर महादेव

Started by शिवाजी सांगळे, February 18, 2023, 12:19:08 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हर हर महादेव

हरवितो चिंता हरेक न् भव ताप
जपावा मंत्र, हर हर महादेव जाप

सांबसदाशिव, महादेव हा भोळा
त्रिनेत्र धारी उध्दारतो हा सकळा

विलोपूनी चिता भस्म सर्वांगाला
आवडते त्या निलकंठी सर्पमाला

त्रिशूळ शस्त्र, वाद्य डमरू संगाती
कैलासाचा राणा, हा पार्वती पती

संकटी जाप हर हर महादेव करू
आदिदेवा भोळ्या मनोभावे स्मरू

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९