सोनियाचा उंबरा

Started by madhura, September 09, 2010, 11:08:58 PM

Previous topic - Next topic

madhura

सोनियाच्या उंब-यात प्रकाशाची उधळण
तुम्हासाठी घेऊन आलो काळजाचं निरुपण
सूर्यदेव आभाळात पाखरांची किलबील
पाणवठे जागे झाले काकणांची किणकिण
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग

ऐका कथा सांगतो पुण्यवान ओसरीची
समाधानी वेळू मध्ये वाजलेल्या बासरीची
नात्यासंगे हलणा-या हिरव्याकंच तोरणाची
तापलेल्या अंगणात पोळलेल्या पावलांची
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग


गीत    -    दासू वैद्य
संगीत    -    अशोक पत्की
स्वर    -    माधुरी करमरकर,  स्वप्नील बांदोडकर
       (शीर्षक गीत, मालिका: सोनियाचा उंबरा, वाहिनी: ई टीव्ही)