आईच्या मुलावरल्या प्रेमाची कविता-बाळा तू माझा जीव आहेस, मुला तू माझा प्राण आहेस

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 05:53:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, आईच्या मुलावरल्या प्रेमाची कविता-गीत ऐकवितो. "चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही शनिवार-सायंकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू)
-----------------------------------------------------------------

                  "बाळा तू माझा जीव आहेस, मुला तू माझा प्राण आहेस !"
                 --------------------------------------------------

बाळा तू माझा जीव आहेस,
मुला तू माझा प्राण आहेस !

बाळा तू माझा जीव आहेस,
मुला तू माझा प्राण आहेस !
तू मला मिळालेला ठेवा आहेस,
तू मला मिळालेला आशीर्वाद आहेस !

बाळा तू माझा जीव आहेस,
मुला तू माझा प्राण आहेस !
तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस,
तू माझे अविभाज्य अंग आहेस !

आकाशातील सूर्य चंद्र तू माझा
नयनातील तारा आहेस तू माझा ✨
तुलाच पाहून मी जगतेय बाळा,
सहाराचं आहेस तू एक माझा.

तुला खेळताना पाहून मला बालपण आठवतं
तुला बागडताना पाहून मला लहानपण आठवतं
खेळण्यांशी खेळणारा, तू मोहक खेळणं माझं🐱‍🏍
तुला खेळताना पाहून तुझ्याकडे पहाणं माझं.

माझं एक सुंदर स्वप्न आहेस तू
माझ्या आयुष्याची बहIरच आहेस तू
माझी निराशा दूर करणारा उत्साह आहेस तू,
माझ्या आशांना सुमारच नाही, पण अजुनी लहान आहेस तू

तुझं वय खेळण्या बागडण्याचं
तुझं वय उडण्याचं, विहरण्याचं
तुझ्यावर नाही लादत मी जबाबदारी,
तू आहेस आज माझी जबाबदारी.

आज तू खूप खुश दिसतोस
तुझ्या गुड्ड्याच लग्न आहे ना आज
नवरी गुड्डी पहा कशी घुंघट ओढून आहे,
दिसतेय शर्मिली, येतेय तिला लाज. 🤦‍♂️

स्वप्न पाहतेय माझा गुड्डा कधी मोठा होईल ?
त्याची गुड्डी वधू तो कधी घेऊन येईल ?
तो दिवस पाहायचाय मला बाळा,
तुझी दृष्ट काढायचीय मला, लडिवाळा.

पूर्वेचा शीतल मंद वारा संथ वाहतोय
गारवा तयाचा मन उत्साही करतोय
सान पक्ष्यांचा थवा बागेत विहरतोय,
किलबिलाट, कलकलाट तयांचा मन मोहरतोय.

देवाकडे प्रार्थना तुला लवकर मोठा कर
ढग होऊन अंबरी मुक्त विहार कर
कष्ट केलेत मी तुझ्यासाठी फार, बाळा,
तूच माझ्या म्हातारपणाचा सहारा आहेस, बाळा.

माझा आशीर्वाद आहे तुला, मुला   
तू आहेस माझा एकुलता एक लाडला   
कितीही झालास मोठा, तरी लहानच मला,
कितीही झालास मोठा, तरी सानच मजला.

बाळा तू माझा जीव आहेस,
मुला तू माझा प्राण आहेस !

बाळा तू माझा जीव आहेस,
मुला तू माझा प्राण आहेस !
तू मला मिळालेला ठेवा आहेस,
तू मला मिळालेला आशीर्वाद आहेस !

बाळा तू माझा जीव आहेस,
मुला तू माझा प्राण आहेस !
तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस,
तू माझे अविभाज्य अंग आहेस !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.02.2023-शनिवार.
=========================================