१८-फेब्रुवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, February 18, 2023, 10:24:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०२.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "१८-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                  -----------------------

-: दिनविशेष :-
१८ फेब्रुवारी
'गांबिया'चा स्वातंत्र्यदिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान
१९९८
ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
१९७९
सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.
१९६५
'गांबिया'ला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३३
नवाब बानू ऊर्फ 'निम्मी' – अभिनेत्री
(मृत्यू: २५ मार्च २०२०)
१९२७
मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ 'खय्याम' – संगीतकार
(मृत्यू: १९ ऑगस्ट २०१९)
१९२६
नलिनी जयवंत – अभिनेत्री
(मृत्यू: २० डिसेंबर २०१०)
१९११
कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार
(मृत्यू: २९ जून २०००)
१८९८
एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर
(मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८)
१८८३
क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा
(मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९)
१८७१
बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू
(मृत्यू: २२ आक्टोबर १९३३)
१८३६
गदाधर चट्टोपाध्याय तथा रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंदांचे गुरू
(मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ - कोलकाता, पश्चिम बंगाल)
१८२३
लोकहितवादी
रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ 'लोकहितवादी' – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार. १८४८ ते १८५० या काळात 'प्रभाकर' या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणार्‍या रुढींवर त्यांनी प्रहार केला. त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. 'लक्ष्मीज्ञान' हा त्यांचा ग्रंथ हा अर्थशास्त्रावरील पहिला मराठी ग्रंथ आहे.
(मृत्यू: ९ आक्टोबर १८९२)
१७४५
अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ५ मार्च १८२७)
१४८६
योगी चैतन्य महाप्रभू
(मृत्यू: १५ जून १५३४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९४
पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. १९५७ मध्ये त्यांनी ८२ दिवसांत ८७ कार्यक्रम करुन विक्रम केला.
(जन्म: २२ ऑगस्ट १९३५)
१९९२
नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार
(जन्म: २१ ऑगस्ट १९१०)
१९६७
जे. रॉबर्ट ओपेनहायमर
जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक
(जन्म: २२ एप्रिल १९०४)
१५६४
मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार
(जन्म: ६ मार्च १४७५)
१४०५
शुजा-उद-दिन तैमूर उर्फ तैमूरलंग – मंगोल सरदार
(जन्म: ९ एप्रिल १३३६)
१२९४
कुबलाई खान – मंगोल सम्राट
(जन्म: २३ सप्टेंबर १२१५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.02.2023-शनिवार.
=========================================