II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-कविता-1

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:26:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                            --------------------------------- 

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांच्या काही कविता.   

छत्रपति शिवाजी महाराज कविता--

उत्तमोत्तम युगप्रवर्तक प्रचंड राजा
विवेकवादी गजपती शिवाजी राजा
हिंदुनिष्ठ वसिष्ठ सज्जन राजा
राजनीतिधुरंधर शिवाजी राजा
अभियंता बुद्धीमान प्रेमळ राजा
हिंदभूमीपुत्र शिवाजी राजा
स्वराज्यसंथापक कल्याणकारी
पुरुषोत्तम रामस्वरूप शिवाजी राजा
स्वाभिमानी महत्वकांक्षी अदभूत राजा
शिवशंकर विष्णू ब्रम्ह राजा
धैर्यशील कृपाळू श्री शहाजीपुत्र
जिजानंदन शिवाजी राजा....
=========================================

॥ राजे शिवाजी..।।
जिजाऊ पोटी जन्मला
ऐसा एक सिंह, स्वराज्यासाठी
ज्याने झीजवला आपुला देह..
शत्रुवरती करी हा असा घणाघात,
एकाच हल्ल्यात
धाडी त्यांस यमसदनात..
शिवाई देवीचा होता
त्यांच्या डोक्यावर हात
महाराष्ट्रातील जनतेच्या
हे आहे अन राहील हृदयात..
स्वराज्यासाठी लढतांना
ज्यांनी लावली जीवाची
बाजी धन्य जाहलो मी, ते आहे
आमुचे राजे छत्रपती शिवाजी..
=========================================

--बी डी आंबरेकर
----------------

           (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टेटस.entrepreneurship d.कॉम)
          -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================