II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-कविता-5

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:32:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांच्या काही कविता.   

छत्रपति शिवाजी महाराज कविता--

यमाला थूयाथूया नाचवायचा
तलवारीला सुद्धा लाजवायचा
पराक्रमाला ज्याच्या काळोखही थरथरायचा
सूर्य ढगाआड लपायचा
वाराही ज्याच्या समोर बाद व्हायचा
नजरेला नजरेत बसवून झुकवायचा
डोळ्यात डोळे घालून पहायचा
शत्रूला भुंड्या डोक्याने पाळवायचा
कधीही माघार नाही घ्यायचा
छातीची ढाल करून लढायचा
एकदाही पराभूत नाही व्हायचा
वाघ पाहून ज्याला
इतभर माघे सरकायचा
जणू पहाड होता अफाट ताकदीचा
मुकुट शोभे तो मराठ्यांचा
हो छावा म्हणतात त्याला
"रौद्र शंभू"नावाचा
=========================================

राजे... !!!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
म्हणजे,
छत्रपति शिवाजी महाराज
=========================================

--बी डी आंबरेकर
-----------------

           (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टेटस.entrepreneurship d.कॉम)
          -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================