II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा-स्टेटस-1

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:37:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           --------------------------------- 

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांवर काही स्टेटस.   

=========================================
🔥प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते🚩🚩

--स्वराज्य घडवले शिवबानी
मावळे होते साथीला
गर्व कधी नाय
जातीचा कारण
अभिमान आहे या
मातीचा
🔥जय शिवराय🔥

--भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता,
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता..!

--शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची 
किर्ती राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

--आयुष्यमिळणं हा नशिबाचा भाग आहे
मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे
पण 350 वर्षानंतर ही रयतेच्या
मनात राहणं हा कर्माचा भाग आहे!

#Whatspp आणि #FACEBOOKकाढलं #गोऱ्यांनी
आणि त्यावर हवा
केली...
#शिवरायांच्या पोरांनी.......
#दिल_से_जय_शिवराय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
--निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा 🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी चारोळी.इन)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================