II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा-स्टेटस-5

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:44:27 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           --------------------------------- 

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांवर काही स्टेटस.   

=========================================
॥ राजे शिवाजी..।।
जिजाऊ पोटी जन्मला
ऐसा एक सिंह, स्वराज्यासाठी
ज्याने झीजवला आपुला देह..
शत्रुवरती करी हा असा घणाघात,
एकाच हल्ल्यात
धाडी त्यांस यमसदनात..
शिवाई देवीचा होता
त्यांच्या डोक्यावर हात
महाराष्ट्रातील जनतेच्या
हे आहे अन राहील हृदयात..
स्वराज्यासाठी लढतांना
ज्यांनी लावली जीवाची
बाजी धन्य जाहलो मी, ते आहे
आमुचे राजे छत्रपती शिवाजी..
🌺🌺🌺🌺🌺

🌺🌺🌺🌺🌺
--अग्निशिखा त्या शांत जाहल्या, शांत जाहला ज्वालामुखी
विझली ज्योत शंभूपर्वाची, भीमा इंद्रायणी झाल्या दुःखीं ।। धृ ।।
श्राप लाभला फितुरीचा, पुसली गेली सारी नाती
कोल्ह्याकुत्र्यांच्या हाती गवसले, मराठीयांचे छत्रपती
छळ जाहला चाळीस दिवस तो तेज तयांचे कधी न ढळले
शरीराच्या त्या करेकपातून थेंब थेंब रक्तांचे गळ
धर्म राखला शान राखली मान राखली धर्माची
अखेरच्या त्या क्षणापर्यंत न सोडिली वाट कर्माची
मृत्यूही नतमस्तक झाला, झुकला राजे तुम्हपुढे
अमावस्या मृत्युंजय झाली, फाल्गुनीची तो फिका पडे
औरंग्याची घमेंड जिरली तख्त त्यागले भयामुळे
बलिदान तुमचे सार्थ जाहले मुजरा राजे तुम्हपुढे
महाराष्ट्र सारा पोरका झाला शोककळा सर्वामुखी
विझली ज्योत शंभूपर्वाची, भीमा इंद्रायणी झाल्या दुःखी ।।
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी चारोळी.इन)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================