II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा-स्टेटस-9

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:52:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांवर काही स्टेटस.   

=========================================
--जागवल्याशिवाय जाग येत नाही

ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,

"छत्रपतींचे" नाव घेतल्याशिवाय

माझा दिवस उगवत नाही..

🌺🌺🌺🌺🌺 
--हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं ...

दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं...

पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी ...

अन साम्राज्य निर्माण करायचे असेल

तर "शिवबाचच" काळीज हवं.......!! 


--भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!

घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा

"वाघ" आहे,

ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा

*शिवरायांचे आम्ही भक्त,,,*

*!!"जय जिजाऊ"!!*

*!!'जय शिवराय'!!*

*!!"जय शंभुराजे"!!*
🌺🌺🌺🌺🌺

🌺🌺🌺🌺🌺
--ॐ" बोलल्याने मनाला शांती मिळते.

"साई" बोलल्याने मनाला शक्ती मिळते.

"राम" बोलल्याने पाप मुक्ती मिळते.

"जय शिवराय" बोलल्याने आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते.

🌺🌺🌺🌺🌺
--शिवकाळात नांदत होती सुखात

सारी प्रजा...!!

म्हणुन म्हणती शिवाजी,

माझा जाणता राजा...!!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी चारोळी.इन)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================