II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा-स्टेटस-10

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:53:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांवर काही स्टेटस.   

=========================================
--निधड्या छातीचा,
दनगड कणांचा,
मराठी मनांचा,
भारत भूमीचा एकच राजा,
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा,
मुजरा,
जय जिजाऊ जय शिवराय,
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--मरण आले तरी चालील,
पण शरण जाणार नाही।
Jai Shivaji

--जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होता तो,
रयतेसाठी देव होता तो,
शत्रूसाठी तळपती आग होता तो,
मुघलांचा बाप होता तो,
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून,
अभिमानाने भरून जाई छाती,
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात,
वसतात राजे शिवछत्रपती,
शिवजयंती च्या सर्वांना शुभेच्छा।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला,
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,
असा एक "मर्द मराठा शिवबा" होऊन गेला।
HAPPY SHIVAJI JAYANTI.
=========================================

                       (साभार एवं सौजन्य-संदर्भ-काइंड स्टेटस.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================