II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा-स्टेटस-11

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:55:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           --------------------------------- 

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांवर काही स्टेटस.   

=========================================
--पहिला दिवा त्या देवाला,
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे,
इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा एकच राजा म्हणजे,
"राजा शिवछत्रपती" मानाचा मुजरा,
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--स्त्रियांचा जो ठेवितो आदर,
ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर,
त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे,
ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे,
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--शिवराय आपले प्राण ‪‎शिवराय‬ मराठ्यांची जाण,
शिवराय सकल हिंदुस्थानाची शान,
शिवराय हिंदवी स्वराज्याला लाभलेली सोन्याची खान,
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा जय शिवराय।
HAPPY SHIVAJI JAYANTI.
=========================================

                       (साभार एवं सौजन्य-संदर्भ-काइंड स्टेटस.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================