II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा-स्टेटस-12

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 10:57:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांवर काही स्टेटस.   

=========================================
--सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी भगवा टिळा,
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा,
आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही खुळखुळा,
अय नाद करायचा नाही आमचा नादच खुळा,
छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा,
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--स्वराज्यासाठी ज्याने वेचले आपले आयुष्य,
पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्याचे लक्ष्य,
स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार,
शिवजयंती दिनी करु त्या,
शिवछत्रपतींचा जयजयकार,
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज,
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--इतिहासाच्या पानावर आणि आमच्या,
हृदयावर फक्त संभाजी राजाच नाव कोरलय।
HAPPY SHIVAJI JAYANTI.

--एकची तो राजा शिवराय जाहला,
नगार्यांच्या नादात शिवनेरी आनंदला,
आई जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास आला,
पराक्रमाचा बादशाह महाराष्ट्री अवतरला,
एकची तो राजा शिवराय जाहला,
हजारो मावळे उभे ठाकले,
दिसली नवी आशा मर्दमराठा पराक्रमाने दुमदुमल्या दाही दिशा,
तोफांसमोरी तलवार घेऊनी उभा ठाकला एकची तो राजा शिवराय जाहला,
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज।
HAPPY SHIVAJI JAYANTI.
=========================================

                       (साभार एवं सौजन्य-संदर्भ-काइंड स्टेटस.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================