अश्रुंवर एक दुःखद कविता-माझे ओठ आज निःशब्द आहेत,माझे अश्रूच माझी कहाणी सांगताहेत

Started by Atul Kaviraje, February 19, 2023, 04:55:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, अश्रुंवर एक दुःखद कविता-गीत ऐकवितो. "ये आँसू मेरे दिल की ज़ुबान हैं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रविवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(ये आँसू मेरे दिल की ज़ुबान हैं)
-------------------------------------------

          "माझे ओठ आज निःशब्द आहेत, माझे अश्रूच माझी कहाणी सांगताहेत !"
         ---------------------------------------------------------------

माझे ओठ आज निःशब्द आहेत,
माझे अश्रूच माझी कहाणी सांगताहेत ! 😢

माझे ओठ आज निःशब्द आहेत,
माझे अश्रूच माझी कहाणी सांगताहेत !
जणू माझ्या मनाचे ते प्रतीक आहेत,
आज तेच माझे शब्द आहेत !

माझे ओठ आज निःशब्द आहेत,
माझे अश्रूच माझी कहाणी सांगताहेत !
माझे दुःख मी आजवर मनातच ठेवलंय,
पण अश्रूंनी ते वाहूनच सांगितलंय. 😂

हे अश्रू जणू माझं मनचं आहेत
मी रडलो तर अश्रूही रडताहेत :'(
मी हसलो तर तेही हसताहेत,
मुक्त वहात ते व्यक्त होताहेत.

डोळ्यातून वाहणारा प्रत्येक थेम्ब तुझी याद देतोय
नयनांतून झरणाऱ्या या पाण्यात तुझी छबी दाखवतोय
मनातल्या भावना अश्रूंवाटे आज वाहताहेत, :'(
तुझ्यावरली प्रीत ते आज दाखवून देताहेत.

माझ्या तनI-मनात तू आहेस
अजुनी भंगलेल्या हृदयातही तूच आहेस
अश्रूंच्या प्रत्येक थेंबात तू आहेस,
माझ्या रक्तातही तुझीच प्रीत आहे.

एकत्र होतो तेव्हा, एकत्र चालत होतो
हाती माझ्या तेव्हा तुझाच हात होता
जगण्याचा अर्थ तुझ्यासवे कळला होता,
प्रीतीचा नवा अनुभव मिळाला होता.

आज का मग मला अशी सोडून चालली आहेस ?
काय झालं, तू मला पाठ दाखवून जात आहेस ?
माझ्यावर तू नाखूष आहेस का ?
माझ्याबरोबर तू आनंदी नाहीस का ?

माझं काही चुकलं, तर मला माफ कर
दुःखात मला ठेवून, जाऊ नकोस दूर
मला अशी नकोस तडपवू, काहीतरी बोल,
माझ्या भावनांशी नको खेळूस, होऊ नकोस निष्ठुर.

हे दर्दभरे गाणे माझं दुःखच सांगतंय
मनातल्या भावना माझ्या ते बयान करतंय
ये परतुनी, माझ्या भावनांची कदर कर,
माझ्या किंमती अश्रुंचे काही मोल कर. 

माझे ओठ आज निःशब्द आहेत,
माझे अश्रूच माझी कहाणी सांगताहेत ! 😢

माझे ओठ आज निःशब्द आहेत,
माझे अश्रूच माझी कहाणी सांगताहेत !
जणू माझ्या मनाचे ते प्रतीक आहेत,
आज तेच माझे शब्द आहेत !

माझे ओठ आज निःशब्द आहेत,
माझे अश्रूच माझी कहाणी सांगताहेत !
माझे दुःख मी आजवर मनातच ठेवलंय,
पण अश्रूंनी ते वाहूनच सांगितलंय.😂

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================