मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-105-स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ?

Started by Atul Kaviraje, February 20, 2023, 10:15:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-105
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ?"

                             स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ?--
                            -------------------------

     स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ते मला नक्की माहीत नाही. इथे कोणी मानसोपचार तज्ञ असल्यास तिने / त्याने बरोबर काय ते सांगावे. माझ्या माहिती प्रमाणे स्किझोफ्रेनिया म्हणजे dual personality. जसे,

     पावसाळा झाला कि आपण धरणे कधी भरतात याची चातका सारखी वाट पाहतो; रोजच्या वर्तमान पत्रात कोणते धरण किती भरले याची बातमी असते; पावसाळा संपला कि आपण कोणत्या धरणात किती पाणी आहे याचा रोज आढावा घेतो; ते पाणी कुणाला (शहराला, शेतीला, उद्योगांना) किती द्यायचे यावरून अटितटी ला येतो. पण त्याच बरोबर धरणांची काही गरजच नाही; धरणे ही फक्त पैसे कमवण्या करता बांधली जातात असे दाढी कुरवाळत सांगणार्यांना पर्यावरण व जल संबंधित कार्यक्रमात प्रमुख पाव्हणे म्हणून बोलवितो; अरुणाचल प्रदेश येथ पासून केरळ पर्यंत कोणत्याही धरणाला विरोध करणे हाच ज्यांचा पूर्ण वेळ व्यवसाय आहे त्यांना "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते" असे मानून आपल्या वर्धापन दिन किंवा तत्सम दिवशी प्रमुख वक्ते म्हणून बोलवितो व त्यांची infrastructure विरोधी बडबड चवीने ऐकतो; पाचशे वर्ष पूर्वी राजस्थानात आपले पूर्वज जे करीत होते तेच आपण सध्या पण करावे असे संगण्यार्यांचे "जल तज्ञ" असे संबोधत त्यांचा सत्कार करतो; किंवा

     पाणी व/वा कोळसा यांच्या कमतरतेने जल विद्युत / औष्णिक वीज प्रकल्प बंद पडू लागले की भारनियमनाच्या चाहुलीने कासावीस होतो; पण त्याच बरोबर पश्चिम घाटाच्या शाशव्त विकास करता (म्हणजे नक्की काय ते अजून ठरायचे आहे) व पर्यावरण संवर्धना करता पश्चिम घाटातील सध्या असलेले सर्व जल विद्युत / औष्णिक वीज प्रकल्प बंद करून मोडीत काढावे व नवीन बांधायला अजिबात परवानगी नाही असे सांगणार्या WGEEP अहवालाला डोक्या वर घेवून नाचतो.

     यालाच (सामुहिक) स्किझोफ्रेनिया म्हणतात न ?

--चेतन पन्डित
(February 7, 2013)
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.02.2023-सोमवार. 
=========================================