बेभान

Started by शिवाजी सांगळे, February 21, 2023, 01:30:55 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बेभान

धुंद तुझ्या आठवणीत..बेभान नाचते
हर एक पदन्यासावर तुला रे आठवते

उरेना भान मज सुर तालाचे ते कसले
स्पंदनात ह्रदयातल्या तुलाच रे शोधते

काळोखात गर्द येथे हा गारवा सोबती
एकांतातला विरह माझा दूर मी करते

लवचिक अदा अंग प्रत्यांगाची साऱ्या
इशाऱ्यातुनी हळव्या तुलाच आमंत्रिते

सजतो असा रंगढंग हा चढतो मनावर
मिसळविण्या तयात तुजला बोलाविते

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९