मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-128-माझे ध्येय / माझे स्वप्न-डॉक्टर

Started by Atul Kaviraje, February 21, 2023, 09:36:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-128
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे ध्येय / माझे स्वप्न-डॉक्टर"

     प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही न काही स्वप्न रचून ठेवतो. त्याला आयुष्यामध्ये काय काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे आणि काय बनायचे आहे इत्यादी गोष्टीचा प्रत्येक विद्यार्थी विचार करीत असतो. काहींचे स्वप्न इंजिनियर बनायचे असते, काही लेखक तर काही पोलिस व शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहत असतात. मी सुद्धा मला मोठे होऊन काय बनायचे आहे याचा विचार करून ठेवला आहे. माझ्या आयुष्याचे ध्येय डॉक्टर बनायचे आहे व अनेकांचे प्राण वाचवून नवीन जीवन द्यायचे आहे.

     जरी डॉक्टर देव नसतो तरी त्याच्या हातात जीवन मृत्यूचा निर्णय असतो. जरी डॉक्टर मृत व्यक्तीला जिवंत करू शकत नाही तरी तो कठीण परिस्थितीतून रुग्णांना काढू शकतो. मी लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत आहे. मी पाहिले आहे की काही डॉक्टर फक्त पैशांसाठी आपले काम करतात. परंतु माझ्या जीवनाचे ध्येय डॉक्टर बनून पैसे कमावणे नाही आहे. मला लोकांची मनोभावे सहायता करायची आहे. जे गरीब आहेत व मोठं मोठ्या रोगांनी ग्रस्त आहेत त्याची सेवा मी करणार आहे.

     आज आपल्या देशासह जगभरात नवनवीन रोग पसरत आहेत. जर मी डॉक्टर बनून या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले तर मला खूप आवडेल. आज आपल्या समाजात खूप सारे असे लोक आहेत ज्यांना कमी वयात अनेक रोगांनी ग्रासले आहे. मी डॉक्टर बनून लोकांना जास्त प्रमाणात दवा औषधी खाण्यापेक्षा व्यायामाचे महत्त्व समजावून सांगेल. आयुर्वेदिक पद्धतीने रोगांना नियंत्रणात करण्यासाठी मी प्रयत्न करेल.

     मी लहान असताना माझे वडील मला सांगायचे की बेटा तुला मोठे होऊन काहीतरी असे करायचे आहे की तू अधिकाधिक लोकांची मदत करू शकशील. डॉक्टर बनण्याचे स्वप्न मी तेव्हापासून पाहू लागलो. कारण डॉक्टर बनुनच मी रोगांनी ग्रस्त लोकांची सेवा करू शकेल. मी डॉक्टर बनल्यावर कमी पैश्यात अधिकाधिक लोकांची सेवा करेल व समाजाला निरोगी बनवण्यासाठी कार्य करेल.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.02.2023-मंगळवार.
=========================================