मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-129-माझे ध्येय इंजीनियर

Started by Atul Kaviraje, February 22, 2023, 09:31:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-129
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे ध्येय इंजीनियर"

     मुलांना लहान पानापासून आयुष्यात काहीतरी मोठे बनण्यासाठी प्रेरित केले जाते. व शाळा कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येक मुला मुलींचे करीयर विषयी काहीतरी स्वप्न असतेच. मी सुद्धा दुसरी तिसरीत असताना शास्त्रज्ञ बनायचे स्वप्न पहायचो. या नंतर जेव्हा मी टीव्ही पाहू लागलो व मला बाहेरील जगाबद्दल कळू लागले तेव्हा मी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहू लागलो. परंतु जेव्हा मी 8 वी मध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझी खरी आवड तंत्रज्ञानात आहे आणि मी निर्णय घेतला की मला इंजिनिअर बनायचे आहे. आता माझे स्वप्न इंजिनिअर बनणे आहे.

     तसे पाहता इंजिनीरिंग हे एक विस्तृत करीयर क्षेत्र आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल,सिव्हिल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल, बायो केमिकल इत्यादी प्रकार समाविष्ट आहेत. परंतु मला कॉम्प्युटर सायन्स मध्ये अधिक आवड आहे. माझ्या वडिलांनी माझी ही आवड ओळखून मला एक लॅपटॉप आणून दिले आहे. या मध्ये मी बेसिक कोडींग शिकत आहे. जेणेकरून कॉलेज मध्ये गेल्यावर मला कॉम्प्युटर सायन्स जास्त कठीण वाटणार नाही.

     मी इंजिनिअर बनण्याचे स्वप्न यासाठीही पाहिले आहे कारण मला मोठे होऊन देशाच्या तांत्रिक विकासामध्ये मोठे योगदान द्यायचे आहे आणि यासाठी इंजिनिअरिंग शिवाय दुसरे कोणतेच शिक्षण योग्य नाही. मला कॉम्प्युटर बद्दल आधी पासूनच कुतूहल आहे. व आता तर मी खूपच मन लाऊन त्याचा अभ्यास करीत असतो. मागील दोन वर्षात शालेय परीक्षेत मला संगणक विषयात संपूर्ण वर्गात सर्वात जास्त गुण मिळाले आहे. पुढील शिक्षणासाठी माझे वडील मला उच्च महाविद्यालयात प्रवेश करवून देणार आहेत. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ते म्हणतात की एक दिवस तू तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण करशील.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.02.2023-बुधवार.
=========================================