गुंफणीत हातांच्या

Started by mkapale, February 23, 2023, 07:23:54 AM

Previous topic - Next topic

mkapale

गुंफणीत हातांच्या
भेटत प्रेमी दोन आहेत...
न जाणे काय बोले मन
घेई हिंदोळे काया पण
ठोक्यांना फुटली वाचा..

गुंफणीत हातांच्या
भेटत प्रेमी दोन आहेत...

ओठांची उघडझाप ही
बोले न बोलताही
सांगे मला कि वाढू दे
अल्लडता प्रेमाची
ये जवळ अशी सखे
वीज दौडे नसा नसात..


क्षितिजाला हे आपले
सुंदर गुपित आवडे
गुंतलेल्या श्वासांचे
हितगुज ही आवडे
श्रावणाच्या सारी करती
मोत्यांची उधळण चहूकडे

गुंफणीत हातांच्या
भेटत प्रेमी दोन आहेत...
न जाणे काय बोले मन
घेई हिंदोळे काया पण
ठोक्यांना फुटली वाचा..