आहेस तू...

Started by mkapale, February 23, 2023, 02:40:57 PM

Previous topic - Next topic

mkapale

आहेस तू, माझ्या जगाचा किनारा
मी अन माझ्या प्रेमाचा निवारा
आहे तुझ्याच साठी
आहेस तू, साऱ्या रंगांचा पिसारा
ऋतूंच्या लावाण्याचा झरा
आहेस तू...आहेस तू...

वाहते चहूकडे जसे हे चांदणे
पाण्यात जागलेली ज्योत तू
हो...डोळ्यात सजलेली आहे आशा

नाही..नाही...तुझ्यासारखे कोणी नाही

आहेस तू, माझ्या जगाचा किनारा
मी अन माझ्या प्रेमाचा निवारा
आहे तुझ्याच साठी

चालत जाता वाटेवरती
येई अचानक वळण जसे
वाटे कधी कि क्षणात एका
द्यावे सोडून सारे व्हावे तुझे

चमकला तारा मन सैरावैरा धावे रे
छेडली धून मन माझे  हे गाते एक रे

जवळ येताच हे शब्द विरले जणू
कोण आहेस माझी सांग ना.. तू

वाच डोळे माझे , अबोल मी जरी
ऐक डोळ्यांनी माझा कोण आहेस तू

आहेस तू, माझ्या जगाचा किनारा
मी अन माझ्या प्रेमाचा निवारा
आहे तुझ्याच साठी