२३-फेब्रुवारी-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, February 23, 2023, 09:26:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.०२.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                  "२३-फेब्रुवारी-दिनविशेष"
                                 -----------------------

-: दिनविशेष :-
२३ फेब्रुवारी
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर
१९९७
रशियाच्या 'मीर' या अंतराळस्थानकामधे आग लागली.
१९९६
कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ
१९६६
सीरियात लष्करी उठाव झाला.
१९५२
संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी (EPF) विधेयक मंजूर केले.
१९४७
आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना
१९४५
इवो जिमाची लढाई
दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
१९४५
दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.
१९४५
दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
१९४५
दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.
१९४१
डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.
१७३९
चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.
१४५५
पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित झाले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६५
हेलेना सुकोव्हा
हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
१९६५
अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर
(मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)
१९५७
येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते
(मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)
१९१८
गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ 'विवेक' – मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले अभिनेते
(मृत्यू: ९ जून १९८८)
१९१३
प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार
(मृत्यू: ६ जानेवारी १९७१)
१६३३
सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक
(मृत्यू: २६ मे १७०३)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१५
राणा भगवानदास
राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले 'हिन्दू' मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
(जन्म: २० डिसेंबर १९४२)
२००४
सिकंदर बख्त – परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (भाजप)
(जन्म: २४ ऑगस्ट १९१८)
२००४
विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: २२ जानेवारी १९३४)
२०००
वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक
(जन्म: ? ? ????)
१९९८
रमण लांबा – क्रिकेटपटू
(जन्म: २ जानेवारी १९६०)
१९६९
मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री
(जन्म: १४ फेब्रुवारी १९३३ - नवी दिल्ली)
१९४४
लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन 'बॅकेलाईट' नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते.
(जन्म: १४ नोव्हेंबर १८६३ - घेन्ट, बेल्जिअम)
१९०४
महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, 'इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे 'जर्नल ऑफ मेडिसीन' हे मासिक सुरू केले.
(जन्म: २ नोव्हेंबर १८३३ - पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)
१७९२
सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती.
(जन्म: १६ जुलै १७२३ - प्लिम्प्टन, प्लायमाऊथ, इंग्लंड)
१७७७
कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.
(जन्म: ३० एप्रिल १७७७)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.02.2023-गुरुवार. 
=========================================