मैत्रीत धोका यावर कविता-गीत-मित्रा तू असे का वागलास, मैत्रीला तू असा जागलास ?

Started by Atul Kaviraje, February 23, 2023, 10:22:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, मित्राच्या विश्वासघातावरली कविता-गीत ऐकवितो. "मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही निशा-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे)
----------------------------------------------

                   "मित्रा तू असे का वागलास, मैत्रीला तू असा जागलास ?"
                  ------------------------------------------------

मित्रा तू असे का वागलास,
मैत्रीला तू असा जागलास ?

मित्रा तू असे का वागलास,
मैत्रीला तू असा जागलास ?
किती विश्वास होतI माझा तुझ्यावर,
मैत्रीचा तू विश्वासघातच केलास !

मित्रा तू असे का वागलास,
मैत्रीला तू असा जागलास ?
माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन,
माझ्याशी दुश्मनी करून राहिलास !

आज लाज वाटतेय मला तुझी
अपमानच केलास तू आपल्या मैत्रीचा
एकाच ताटात जेवत होतो आपण,
माझ्या मुखाचा घासच तू हिरावून घेतलास !

माझी दोस्ती पाहिलीस, आता दुश्मनीही पहा
माझी यारी पाहिलीस, आता वैरही पहा
मला दुःख दिलेस ना तू आज,
उद्या तू माझ्या मैत्रीलाच तरसून राहा.

माझं मन आज उद्विग्न आहे
माझं मन आज दग्ध आहे
तूच कारणीभूत आहेस याला,
तुझ्यामुळेच हे सारे घडले आहे.

माझं आक्रंदणार मन श्राप देतंय
माझं विदारक मन तुला आज कोसतंय
तुझ्या आयुष्यात कधीच नाही येणार बहार,
तुला यापुढे कधीही नाही चैन पडणार.

माझ्यासारखाच तूही तडपत राहशील
माझ्याप्रमाणे तुही बेचैन होशील
तू एक कोमेजलेले पानच होशील,
तू त्या पानगळीतच पडून राहशील.

माझी मैत्री एक वफाच होती तुझ्यासाठी
तुझी बेवफाईचं दडली होती माझ्यासाठी
इतका कसा तू जुलमी झालास ?
इतका कसा तू निर्दयी बनलास ?

तुला तुझ्या वर्तनाचा पश्चात्ताप होईल
तुला तुझ्या वागण्याची लाजच वाटेल
हास्य तुझ्या चेहऱ्यावरले मावळून जाईल,
संकुचित माणसा, मन तुझं कोसत राहील.

पहा, तुझी बागच उजाडून जाईल
तिथे बहार कधीच नाही येणार
जिथे होते मुबलक पाण्याचे झरे,
तिथे विराण वाळवंटच दिसणार.

या आलम दुनियेत तुझं कुणीच नसेल
आपला काय परकIही तुझा नसेल
तुझे जीवन अगदी एकाकीच होईल,
तू अगदी एकटा एकटाच राहशील.

तुझ्यावर कुणीच प्रेम करणार नाही
तुला कुणी आपला म्हणणार नाही
तू मग त्या प्रत्येक प्रेमाला तरसशील,
तू सर्वांच्या निंदेला पात्र होशील.

मला हे सर्व नव्हतं बोलायचं
तूच केलंस मला विवश, मित्रा
आता मैत्री काय मला दुश्मनीही कुणाची नको,
माझ्या मैत्रीला तू कायमचाच मुकलास, मित्रा.

मित्रा तू असे का वागलास,
मैत्रीला तू असा जागलास ?

मित्रा तू असे का वागलास,
मैत्रीला तू असा जागलास ?
किती विश्वास होत माझा तुझ्यावर,
मैत्रीचा तू विश्वासघातच केलास !

मित्रा तू असे का वागलास,
मैत्रीला तू असा जागलास ?
माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन
माझ्याशी दुश्मनी करून राहिलास !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.02.2023-गुरुवार.
=========================================