वाट चाललेली

Started by शिवाजी सांगळे, February 24, 2023, 06:40:12 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वाट चाललेली

तुला आठवत नाही...वाट एकत्र चाललेली
भासतात पाऊले मला...वाटेवर पहुडलेली

इतक्यात का विस्मरण ते काळोखाचे तुला
लागलेली ठेच आणि मिठीत तु सावरलेली

सांडते सुगंध गजऱ्याचा तेव्हा तु माळलेल्या
वाट ही सारी कणा कणां मधून गंधाळलेली

कैक स्मृतींची मुक साक्ष...मात्र वाट एकटी
शहारत असेल ती आठवून कथा पाहिलेली

कळो अथवा न कळो कुणास व्यथा मनाची
कळते हीलाच आपण वाट एकत्र चाललेली

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९