प्रेम विश्वासघातावर कविता-प्रेमात ही दरी कसली, प्रेमाची माझ्या व्याख्याच फसली !

Started by Atul Kaviraje, February 24, 2023, 10:58:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेमाच्या विश्वासघातावर कविता-गीत ऐकवितो. "क्या से क्या हो गया, बेवफ़ा, तेरे प्यार में"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही निशा-शुक्रवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(क्या से क्या हो गया, बेवफ़ा, तेरे प्यार में)
---------------------------------------------------

                  "प्रेमात ही दरी कसली, प्रेमाची माझ्या व्याख्याच फसली !"
                 --------------------------------------------------

प्रेमात ही दरी कसली,
प्रेमाची माझ्या व्याख्याच फसली !

प्रेमात ही दरी कसली,
प्रेमाची माझ्या व्याख्याच फसली !
प्रेमात झोकून दिले होते सर्वस्व,
तुझ्या प्रेमाने माझी फसगत केली !😒

प्रेमात ही दरी कसली,
प्रेमाची माझ्या व्याख्याच फसली !
काय मिळालं तुला प्रतारणा करून ?
तू अविश्वासाची देवीचं निघालीस !

किती स्वप्ने पIहिली मी प्रेमात
किती आशा बाळगल्या होत्या मी मनात
त्या सर्व सर्व फोल ठरल्या,
बेवफाईची हद्द तू पार करून गेलीस !

तू असं का वागलीस, प्रिये ?
वफाई तू नाही निभावलीस
प्रेमाला माझ्या तू खेळ समजलीस,
नकळत मला तू खेळवत राहिलीस.🐱‍🏍

मला आधीच संभ्रम होता
तुझे प्रेम हाच एक भ्रम होता
माझ्या भ्रमाचा भोपळा फुटलाय,
त्याला तूच कारणीभूत झालीस.

ज्याला प्रेम समजत होती दुनिया
ज्याला सौंदर्य म्हणत होतं जग
ते सौंदर्य आज शापित निघालंय,
हृदय शत शत तुकड्यात विभागलंय.

आज मन माझं विदीर्ण झालंय
त्याने आजवर खूप सहन केलंय
प्रेम करून मला काय मिळालंय ?🤞
प्रेमाचं हेच फळ मला मिळालंय ?

तुझ्या माझ्यात खूप अंतर पडलंय
तुझ्या बेवफाईमुळे हे सारं घडलंय
मन मोडलंय, मन तुटलंय, मन रडतंय,😂
आता पुन्हा प्रेमात नाही पडायचं, त्याने ठरवलंय.

कधी तुझा माझा मार्ग एकचं होता
कधी तुझा हात माझ्या हाती होता
पण नाही, ते फक्त एक दुःस्वप्नचं होतं,
तुझ्या प्रेमाचं ते एक नाटकच होतं.

असं कधी घडेल मला वाटलं नव्हतं
तुझं अंतरंग तेव्हा मला कळलं नव्हतं
बेवफाई कुटून भरली होती तुझ्या अंतरात,
वफाईचा मागमूसही नव्हतंI तुझ्या मनात.

वफाई बेवफाई या शब्दांना मी टाळतोय
विश्वास अविश्वासाला मी तिलांजली देतोय
सुन्न मनाने मी माझा मार्ग आक्रमतोय,🤔
पुन्हा न परतण्याचा निग्रह करतोय.

प्रेमात ही दरी कसली,
प्रेमाची माझ्या व्याख्याच फसली !

प्रेमात ही दरी कसली,
प्रेमाची माझ्या व्याख्याच फसली !
प्रेमात झोकून दिले होते सर्वस्व,
तुझ्या प्रेमाने माझी फसगत केली !😒

प्रेमात ही दरी कसली,
प्रेमाची माझ्या व्याख्याच फसली !
काय मिळालं तुला प्रतारणा करून ?
तू अविश्वासाची देवीचं निघालीस !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.02.2023-शुक्रवार.
=========================================