दिन-विशेष-लेख-जागतिक मुद्रण दिन

Started by Atul Kaviraje, February 25, 2023, 11:14:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                                "जागतिक मुद्रण दिन"
                               --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     काल दिनांक-२४.०२.२०२३-शुक्रवार होता, फेब्रुवारी २४ हा दिवस "जागतिक मुद्रण दिन " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत. .

     दरवर्षी 24 फेब्रुवारी म्हणजेच जोहान्स गटेनबर्ग यांचा जन्मदिवस हा जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो. जोहान्स गटेनबर्ग हा एक जर्मन लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक होता. त्यानेच जँगाला आधुनिक मुद्रणकलेची देणगी दिली.त्याच्या फिरत्या यांत्रिक छपाई मानकामुळे मुद्रण क्रांति घडून येऊ शकली जी आधुनिक कालखंडाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.जोहान्स गटेनबर्ग लिहिलेले गटेनबर्ग बायबल हे जगातील पहिले छापिल पुस्तक मानले जाते.

     जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग या व्यक्तीने सन १४५५ मध्ये मुद्रणकलेचा शोध लावला. त्याने छापलेले ४२ ओळीचे लैटीन बायबल पहिलं छापील पुस्तक होय. त्या स्मरणार्थ २४ फेब्रुवारी हा गटेनबर्ग यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक मुद्रणदिन म्हणून साजरा केला जातो.

     मुद्रणकलेचा शोध हा मानवी जीवनातील क्रांतिकारी शोध या शोधामुळे ज्ञान प्रसाराला गती मिळाली. साहित्य प्रकाशनाला वेग आला.

     नियतकालिके निघाली वृत्तपत्रे सुरु झाली. वृत्तपत्रे लोकशिक्षण, सामाजिक व राजकीय प्रबोधनाचे प्रभावी साधन.

     लाकडाच्या अक्षराचे ठसे, शिळा प्रेस शीशाच्या अक्षराचे खिळे स्क्रीन प्रिंटींग सायक्लोस्टाईल अशी प्रगती करत मुद्रण कला डिजिटल प्रिंटींग विकासाच्या उच्च अवस्थेला पोहचली आहे.

     मानवाने मध्य युगातून आधुनिक युगात प्रगती साधली हे सर्व छपाईच्या कलेमुळे घडले. याचे सर्व श्रेय छपाई कलेचा संशोधक जोहान्स गटेनबर्गला जाते.

               FAQ--

--Q.1) - जागतिक मुद्रण दिन कधी साजरा केला जातो ?

--Ans. जागतिक मुद्रण दिन 24 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.

--Q.2) - मुद्रण कलेचा शोध कोणी लावला ?

--Ans. जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग या व्यक्तीने सन १४५५ मध्ये मुद्रणकलेचा शोध लावला.

--डॉक्टर चक्रधर.एस.मोरे
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी महिला.कॉम)
                   -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.02.2023-शनिवार.
=========================================