प्रियेची मनधरणी करणारी कविता-मला अशी सोडून जाऊ नकोस, माझं हृदय तोडून जाऊ नकोस !

Started by Atul Kaviraje, February 25, 2023, 06:36:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेची मनधरणी करणारी कविता-गीत ऐकवितो. "खिलौना जानकर तुम तो, मेरा दिल तोड़ जाते हो 💔"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही शनिवार-संध्या आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(खिलौना जानकर तुम तो, मेरा दिल तोड़ जाते हो 💔)
--------------------------------------------------------------

           "मला अशी सोडून जाऊ नकोस, माझं हृदय तोडून जाऊ नकोस !💔"
          -------------------------------------------------------------

मला अशी सोडून जाऊ नकोस,
माझं हृदय तोडून जाऊ नकोस !💔

मला अशी सोडून जाऊ नकोस,
माझं हृदय तोडून जाऊ नकोस !💔
खेळणं समजू नकोस त्याला,🐱‍🏍
मन मानेल तसं खेळू नकोस !

मला अशी सोडून जाऊ नकोस,
माझं हृदय तोडून जाऊ नकोस !💔
असं काय घडलंय प्रिये, सांग ना,
अशी पाठ फिरवून जाऊ नकोस !

आज मला कुणाचाच नाहीय सहारा
तुझाच आहे आज मला आसरा
तोंड फिरवून अशी जाऊ नकोस,
मला अशी बेहाल करू नकोस !😒

कुणाच्याही बोलण्याला तू फसू नकोस
जग काय नावच ठेवत राहील
या लोकांच्या नादी तू लागू नकोस,
त्यांच्यावर तू विश्वास ठेवू नकोस.

असं माझ्या मनाशी खेळून काय मिळणार ?
माझं हृदय तोडून तुला काय मिळणार ?
थांब जराशी, माझं ऐक जरा,
रुसवा सोड, अशी तटस्थ राहू नकोस. 

माझं काय, मी आज आहे उद्या नाही
मी माझ्या नशिबाला दोष देत नाही
आजवर तुझाच होता सहारा मला,
थोडावेळ दे मला, मी काहीच बोलणार नाही.

तुझ्यावर माझा कुठलाच आक्षेप नाही
तुला मी कधीच दोष देत नाही
उलट मलाच खेद वाटत राहतोय, 😒
माझ्यातच काहीतरी उणीव राही.

मोठ्या मुश्किलीने सुख दाराशी होतं
उंबरठा ओलांडून ते आत येत होतं
अचानक काय झालं नाही कळलं,
पाहता पाहता दुःखाने घराला ग्रासलं होतं. 🤦‍♀️

आज सुख पाठ फिरवून निघून गेलंय
दुःख आज पाठीशीच उभं राहिलंय
अश्यात हवा होता मला तुझा सहारा,
पण तुझंही वर्तन वेदना देऊन गेलंय.

तुला मनवण्याचा मी प्रयत्न करतोय
तुला थांबण्याचाही मी आग्रह करतोय
तुझ्याशिवाय माझं नाही कुणीही,
तुझ्याकडेच मी अपेक्षेने पाहतोय.

आज मला अशी सोडून जाऊ नकोस
मला दुःखात ठेवून जाऊ नकोस
तुझ्याबरोबर मी चालूही शकत नाही,
माझा हात असा झिडकारू नकोस.

मला काहीही नकोय तुझ्याकडून
फक्त मला तुझा आधार हवाय
याचकच समज, माझे दुःख उमज,
फक्त मला तुझा मदतीचा हात हवाय. 👍

मला अशी सोडून जाऊ नकोस,
माझं हृदय तोडून जाऊ नकोस !💔

मला अशी सोडून जाऊ नकोस,
माझं हृदय तोडून जाऊ नकोस !💔
खेळणं समजू नकोस त्याला,
मन मानेल तसं खेळू नकोस !🐱‍🏍

मला अशी सोडून जाऊ नकोस,
माझं हृदय तोडून जाऊ नकोस !💔
असं काय घडलंय प्रिये, सांग ना,
अशी पाठ फिरवून जाऊ नकोस !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.02.2023-शनिवार.
=========================================