प्रेम-कहाणीवर कविता-युगानुयुगे आपली ओळख आहे, ही जन्मोजन्मीची प्रेम-कहाणी आहे !

Started by Atul Kaviraje, February 26, 2023, 12:18:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, जन्मोजन्मीची प्रेम-कहाणीवर कविता-गीत ऐकवितो. "सौ बार जनम लेंगे, सौ बार फ़ना होंगे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रविवार-मध्यरात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(सौ बार जनम लेंगे, सौ बार फ़ना होंगे)
-------------------------------------------------

          "युगानुयुगे आपली ओळख आहे, ही जन्मोजन्मीची प्रेम-कहाणी आहे !"
         -------------------------------------------------------------

युगानुयुगे आपली ओळख आहे,
ही जन्मोजन्मीची प्रेम-कहाणी आहे !
कित्येकदा जन्मलो, कित्येकदा निर्वतलो,
अजुनी आपली भेट होतंच आहे !🚻

युगानुयुगे आपली ओळख आहे,
ही जन्मोजन्मीची प्रेम-कहाणी आहे !
तेव्हा होती, आजही आहे, उद्याही असेल,
प्रत्येक जन्मात अशीच आपली साथ असेल. 🚻

नशिबाने कितीही रोखले आपणास
नियती कितीही विरुद्ध गेली आपल्या
पण आपली ताटातूट होणे कठीण आहे,
आपण विभक्त होणे कठीण आहे. 🚻

आमच्या दोघांचे प्रेम चिरकाल टिकेल 💟
आमची वफाईचं आम्हा एकत्र आणेल
आता जरी भरकटली असली पाऊले,
तरी आमचा मार्ग एकचं असेल.

रस्ते वेगळे असले तरी मंजिल एकचं आहे
वाटा अलग असल्या तरी ठिकाण एकचं आहे
केव्हातरी आमची पाऊले एकत्र चालतील,
केव्हातरी आमचे हात हातात असतील. 🚻

आज जरी मन उदासीन असले
आज जरी हृदय आक्रंदत असले
तरी उद्याचा सूर्योदय निश्चितच होईल,
जो आम्हाला निर्विवाद एक करील.

म्हणण्याला हा विरह जरी असला
तरी तुझं माझं मन एकचं आहे👍
आज ताटातूट जरी आपली असली,
उद्याचा रस्ता नक्कीच प्रकाशमान आहे.

त्या दिवसाची मला प्रतीक्षा आहे
जो आपणI दोघांना एक करील
त्या ठिकाणाची मी वाट पाहतोय,
जेथे पुन्हा आपले मनो-मिलन होईल. 💑

तू माझी आहेस, माझीच राहशील
पुढील जन्मीही तू माझीच होशील
पुन्हा एकवार फिरून आपण जन्म घेऊ,
पुन्हा पुन्हा आपण एकमेकांचेच होऊ.

युगानुयुगे आपली ओळख आहे,
ही जन्मोजन्मीची प्रेम-कहाणी आहे !👩‍❤️‍‍👨
कित्येकदा जन्मलो, कित्येकदा निर्वतलो,
अजुनी आपली भेट होतंच आहे !🚻

युगानुयुगे आपली ओळख आहे,
ही जन्मोजन्मीची प्रेम-कहाणी आहे !
तेव्हा होती, आजही आहे, उद्याही असेल,
प्रत्येक जन्मात अशीच आपली साथ असेल. 🚻

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.02.2023-रविवार.
=========================================