प्रियेच्याआठवणीवरलीकविता-ती मला आज विसरून गेलीय,जिच्यावर मी जीवाची कुरवंडी केलीय

Started by Atul Kaviraje, February 26, 2023, 10:30:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेच्या आठवणीवरली कविता-गीत ऐकवितो. "हुए हम जिनके लिए बरबाद, वो हमको चाहे करें न याद"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रविवार-रजनी आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(हुए हम जिनके लिए बरबाद, वो हमको चाहे करें न याद)
----------------------------------------------------------------

           "ती मला आज विसरून गेलीय, जिच्यावर मी जीवाची कुरवंडी केलीय !"
          --------------------------------------------------------------

ती मला आज विसरून गेलीय,
जिच्यावर मी जीवाची कुरवंडी केलीय !
आज जिच्यामुळे मी झालोय बरबाद,
तीच माझ्या हृदयाचे तुकडे करून गेलीय ! 💔

ती मला आज विसरून गेलीय,
जिच्यावर मी जीवाची कुरवंडी केलीय !
मन तिच्यात होतं गुंतलेलं माझं,
त्या मनावर आघात करून गेलीय !

त्या आठवणीतच आज मी झुरतोय
विरहाचे गाणे आज मी गातोय
त्या आठवणी न संपणाऱ्या आहेत,
त्या आठवणी न विरणाऱ्या आहेत.

तोही एक जमाना होऊन गेला
तिच्या विना माझा एकही दिवस नाही गेला
माझ्यापासून दूर ती कधीही नव्हती, 🚻
माझ्यापासून वेगळी ती कधीही नव्हती. 🚻

हाही एक जमाना आहे आता
भेट नाही होतं आज तिची कितींदा
दिल मजबूर होतंय तिच्या भेटीसाठी,
आताश्या होतं नाहीत तिच्या भेटीगाठी.

माझ्या मनाला मी समजावीत आहे
तिची आणि तुझी भेट होणार आहे
माझ्या मनाची समजूत घालत आहे,
तिच्या आठवणींनी मनाला भुलवत आहे.

आणि मग मला ते गाणे सुचत आहे
आणि मग मी ते गीत गात आहे
ती माझी आठवण काढो न काढो,
तिच्या आठवणीत मन तराणा छेडीत आहे.

मी असा एक विझलेला दिवा आहे
ज्याची वात नाही, वातीत तेल नाही
जो कधीच प्रदीप्त नव्हता आजवर,
जो कधीच प्रकाशमान होणार नाही.

ते एक बालपणीचे प्रेम होते
त्यात प्रेम कमी बचपनI जास्त होता
आता ते तिच्या लक्षातही नसेल,
आता ते तिच्या स्मरणातही नसेल.

चार दिवस केले आणि विसरून गेले
जणू ते भातुकलीचा एक खेळच होते 🐱‍🏍
विसरायचे मग करायचेच का ?
एखाद्याला प्रेमात फसवायचेच का ?

आता तिच्याकडे दुःख फिरकतही नाही
आणि माझ्या दुःखाला तर पारावरच नाही
माझी फिर्याद जणू ती अनसूनीच करीत आहे,
माझी तक्रार मी माझ्या आसूंनीच करीत आहे. 😂

तरीही हे वेडे मन मानत नाही
ते अजुनी तिची आशा धरून राही
ती एक असफल कहाणीच होती, 
पण ती आजही समजून घेत नाही.

आणि मग ते तिच्या आठवणीत गाऊ लागतं
तिची ते पुन्हा उमेदीने प्रतीक्षा करू लागतं
तिच्या न संपणाऱ्या आठवणींत ते तिला शोधू लागतं,
आणि त्याला गाणं सुचत जातं, ते गाऊ लागतं.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.02.2023-रविवार.
=========================================