मनुष्या, तू इतका उदास का होतोस, रात्र गेल्यावर सूर्योदय नक्की होतोच !

Started by Atul Kaviraje, February 27, 2023, 03:08:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, हताश मनुष्याची प्रेरणादायी कविता-गीत ऐकवितो. "रात भर का है मेहमां अँधेरा, किसके रोके रुका है सवेरा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सोमवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(रात भर का है मेहमां अँधेरा, किसके रोके रुका है सवेरा)
-----------------------------------------------------------------

      "मनुष्या, तू इतका उदास का होतोस😒, रात्र गेल्यावर सूर्योदय नक्की होतोच !"
     --------------------------------------------------------------------

मनुष्या, तू इतका उदास का होतोस, 😒
रात्र गेल्यावर सूर्योदय नक्की होतोच !
हताश होऊ नकोस, ही रात्र थोडीच आहे,
उद्याची तुझी वाट प्रकाशमान होणार आहे.

मनुष्या, तू इतका उदास का होतोस, 😒
रात्र गेल्यावर सूर्योदय नक्की होतोच !
जीवनात हरून तू आपले आयुष्य संपवू नकोस, 🤔
आयुष्य संपवून तू आपले सर्वस्व गमावू नकोस.

मरण तर दाराशी उभंच असतं केव्हाही
कळतं नकळत मृत्यू झेप घालतो केव्हाही
म्हणून का तू आपले जीवन त्याच्या हवाली करशील ?
हे एकदाच मिळालेले जीवन तू असे मातीमोल करशील ?

थोडा विचार कर हाच तो क्षण आहे
जीवन मृत्यूच्या उंबरठयावर तू उभा आहेस
फिर माघारी, अजून तुझी वेळ नाही आलीय,
स्वीकार जीवनाला, अजून मृत्यूची पाळी नाही आलीय.

ही रात्र जितकी गर्द-काळोखी भासेल
उद्याचा दिवस तुला सुवर्णाचाच दिसेल
रात्रीच्या गर्भातच दडलाय उद्याचा उषःकाल, 
मायूस होऊन का करतोस स्वतःचे हाल ? 😒

या घनघोर बIदलांना घाबरू नकोस 🌧️
पडणाऱ्या विजांना पाहून असा दचकू नकोस ⚡️
आभाळ नंतर स्वच्छ, बेदाग नक्कीच होईल,
वाहणारा निर्मळ पवनच तुला सांगून जाईल.

तुझ्या तक्रारीचा सूर आता बंद कर
तुझे हे अश्रू ढाळणे आता बंद कर 😂
या अश्रूंनाच तू आपले शस्त्र बनव,
घाबरू नकोस, अशीच तू हिम्मत धर. 👍

ज्या परिस्थितीत आहेस तसा जग
उद्या ही परिस्थितीही बदलून जाईल
आता तुझे दुःखाचे दिवस दूर होतील,
तुला जगण्याचे नवे सूर गवसतील.

फक्त जगायचे म्हणून जगू नकोस
असे मरणाला आपलेसे करू नकोस
उगा हे अश्रू वाया दवडू नकोस, 😂
धैर्य धर, असा हिम्मत हरू नकोस. 👍

तुझ्या दुःखांवरचा उपाय तुझ्याकडेच आहे
सुखाची स्वप्नपूर्ती करणे तुझ्याच हाती आहे
दुःखी होऊ नकोस, चिंता करू नकोस, 🤦‍♀️
सुखाचा मार्ग तू आता शोधला आहेस.

पहा प्राचीवर सूर्योदय झालाय
अंधार कुठल्याकुठे पळून गेलाय
तुझ्या अंगात सळसळते चैतन्य भरलंय, 👍
निराशेचे सावट केव्हाच दूर झालंय. 😒

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.02.2023-सोमवार.
=========================================