जगाला कंटाळलेल्या मनुष्याची कविता-गीत-मला आता कुणीही नको, मला ही दुनियाच नको !

Started by Atul Kaviraje, February 27, 2023, 05:08:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, या जगाला कंटाळलेल्या मनुष्याची कविता-गीत ऐकवितो. "ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सोमवार-सायंकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है)
---------------------------------------------------

                    "मला आता कुणीही नको, मला ही दुनियाच नको !"
                   ---------------------------------------------

मला आता कुणीही नको,
मला ही दुनियाच नको !
उबग आलाय मला या जगाचा,
वैताग आलाय मला या दुनियेचा.

मला आता कुणीही नको,
मला ही दुनियाच नको !
स्वार्थी, आपमतलबी, संधीसाधू ही दुनिया,
ढोंगी, सोंगी, अहंकारी, व्यापारी ही दुनिया.

येथे फक्त श्रीमंत महालच उभे आहेत
या महालात उंची मुकुट अन पलंगच आहेत
इथे इतमामाला नोकर चाकर आहेत,
इथे भरजरी वस्त्र-प्रावरणे आहेत.

त्यांना गरिबांचे काय पडलेय ?
त्यांच्या भुकेमुळे त्यांचे काय अडलेय ?
त्यांची भूक फक्त श्रीमंतीचीच आहे,
त्यांची भूक फक्त ऐषो-आरामाचीच आहे.

हे समाजाला कलंकच आहेत
हे समाजाला लागलेला बट्टाच आहेत
यांना माणुसकी काय कळणार ?
यांना माणूसच काय कळणार ?

अशी दुनिया मला बिलकुल नको
अशी लोक मला मुळीच नको
मला येथे नाही राहायचंय,
मला त्यांचं तोंडच नाही पाहायचय.

येथे प्रत्येकजण दुःखी आहे 😢
येथे प्रत्येकजण व्यथित आहे 🤔
साऱ्यांचे शरीर जखमांनी भरले आहे,
साऱ्यांची मने उदासीने व्याप्त आहेत. 😒

प्रत्येकाचा आत्मा तडपतोय इथे
प्रत्येकाचा देह जळतोय इथे
सारीकडे प्रश्नार्थक नजरा आहेत, ?
त्या नजरा उत्तरे शोधताहेत.

ही दुनिया आहे की कत्तलखाना आहे ?
की सर्वांना धुंदीत नेणारा मयखाना आहे ?
सारे सारे जण येथे व्याकुळ आहेत,
सारे सारे जण येथे उद्विग्नच आहेत.

येथे माणसाला काहीच महत्त्व नाही
एक बाहुलेंच तो बनून राही 🐱‍🏍
येथे माणसाचे अस्तित्त्वच नाही,
एक खेळणेच होऊन तो राही. 🐱‍🏍

येथील जीवन हे जीवनच नाही
जणू मुडद्यांची वस्ती उभी राहिलीय
जिवंतपणाचे कुठलेही लक्षण नाही,
जणू मृत्यूने विजयश्री मिळवलीय.

इथे जगणं हे महाकठीण आहे
आणि मरण हे अति स्वस्त आहे
अश्या दुनियेत राहून मी काय करू ?
आणि काय काय मी येथे पाहू ?

इथले वातावरण असह्य होतंय मला
कोसतोय मी इथल्या तरुणाईला
मनमानी चाललीय इथे सर्वत्र यांची,
व्यभिचाराने भरलीत चरित्रे त्यांची.

इथे शरीराचा बाजारचं भरलाय
इथे देह विक्रय सर्रास चाललाय
इथे प्रेम हे प्रेम नाही राहिलय,
तर त्याचा व्यापारचं होऊन राहिलाय.

ही असली कसली दुनिया मी पाहतोय ?
स्वर्ग नाही सारीकडे नरकच दिसतोय
आता माझं मन इथे नाही लागतं,
आता माझंI मूड इथे नाही लागतं.

ही विचित्र दुनिया मी प्रथमच पाहतोय
जिथे माणूस नाही, माणुसकीही नाही
या अजब दुनियेला मी प्रथमच न्याहाळतोय,
प्रामाणिक कुणीच नाही, प्रामाणिकपणा कुठेच नाही.

इथे वफा नाही, बेवफाईचं दिसतेय सर्वत्र
शत्रूच सारे, इथे कुणीच नाही कुणाचा मित्र
प्रत्येकजण मनात अढी बाळगून चाललाय,
जमानाच्या जुन्या रुढीच पाळून चाललाय.

नाही, नको मला अशी दुनियाच नको
नाही, नको मला ही दुनियादारीचं नको
मला आता काहीही नको, कोणीही नको,
मला आता आणि काही काही नको.

ही दुनिया मला पाहवत नाहीय
हे दुःख मला आता सहवत नाहीय
येथून मला खूप दूर जायचंय,
पुन्हा परतून येथे कधीही नाही यायचंय.

ही दुनिया कुणीतरी जाळून टाका रे
या दुनियेला कुणीतरी आग लावा रे
या जगाची कुणीतरी राखरांगोळी करा रे,
हे जग कुणीतरी भस्मसात करा रे.

माझ्या नजरेसमोरून हटवा या दुनियेला
माझ्या डोळ्यांपुढून हाकला या दुनियेला
ज्याची आहे त्याने सांभाळा आपल्या दुनियेला,
तुम्हालाच लखलाभ होवो , माझा रामराम या दुनियेला. 🙏

मला आता कुणीही नको,
मला ही दुनियाच नको !
उबग आलाय मला या जगाचा,
वैताग आलाय मला या दुनियेचा.

मला आता कुणीही नको,
मला ही दुनियाच नको !
स्वार्थी, आपमतलबी, संधीसाधू ही दुनिया,
ढोंगी, सोंगी, अहंकारी, व्यापारी ही दुनिया.

माझ्या नजरेसमोरून हटवा या दुनियेला
माझ्या डोळ्यांपुढून हाकला या दुनियेला
ज्याची आहे त्याने सांभाळा आपल्या दुनियेला,
तुम्हालाच लखलाभ होवो , माझा रामराम या दुनियेला. 🙏

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.02.2023-सोमवार.
=========================================