मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-134-पर्यावरण संवर्धन काळाची गरज

Started by Atul Kaviraje, February 27, 2023, 10:22:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-134
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "पर्यावरण संवर्धन काळाची गरज"

     पर्यावरणाला प्रदूषण आणि शोषण पासून वाचवण्याच्या प्रक्रियेला 'पर्यावरण संवर्धन' म्हटले जाते. पर्यावरणाचे रक्षण आजच्या पिढीला समजावणे खूप आवश्यक आहे म्हणून आज आपण पर्यावरण संवर्धन काळाची गरज मराठी निबंध (Paryavarn samvardhan in marathi) पाहणार आहोत.

     आज मानव प्रगतीमुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. प्राचीन काळात ऋषी मुनी आपल्या आश्रमा बाहेर अनेक झाडे लावत असत. यामुळेच त्यांचे आयुष्य निरोगी व अनेक वर्षे राहत असे.

     तर चला Paryavarn samvardhan in marathi आणि पर्यावरण संवर्धन काळाची गरज या विषयावरील निबंध सुरू करुया.

     आपल्या चारही बाजूंना असलेल्या सुंदर निसर्गात परमेश्वराने एकाहून एक अद्भुत गोष्टी बनवल्या आहेत. सुंदर फुले, हिरवी झाडे, वेगवेगळे रंग आणि रूप असलेले पशुपक्षी इत्यादी गोष्टी आपले मन मोहून घेतात. मानवी जीवनात झाडांचे महत्व विशेष आहे. झाडे मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, ती मनुष्य जीवनाची आधार आहेत. याशिवाय पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व भरपूर आहे.

     परंतु आज मानवाने आपल्या नवनवीन शोधांच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोहचवणे सुरू केले आहे. अश्या काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पृथ्वीवरील अनेक प्राणी आपल्या अन्नासाठी वृक्षांवर अवलंबून आहेत. मनुष्य हवेत असलेला ऑक्सिजन हा प्राणवायू श्र्वसाद्वारे ग्रहण करतो. अशा पद्धतीने वृक्ष मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. मागील काही वर्षांमध्ये देशातील कारखान्यांची संख्या वाढली आहे. या कारखान्यात लागणारा कच्चामाल तसेच देशातील वाढती लोकसंख्या अश्या अनेक गोष्टी वृक्षतोडीसाठी कारणीभूत आहेत.

     देशात होत असलेला पर्यावरणाचा र्हास वेळीच रोखण्यात आला नाही तर येत्या काळात ही खूप मोठी समस्या बनून जाईल. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून जगभरातील देश वृक्षलागवड व जास्तीतजास्त सीएनजी गॅस चा उपयोग करू लागले आहेत. पर्यावरण आपले भविष्य आहे म्हणून याच्या संरक्षणासाठी आपल्याला वेळीच लक्ष द्यावे लागेल.

     पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वात आधी जल प्रदूषणाला रोखावे लागेल. कारखान्यांचे खराब पाणी, घरातील दूषित पाणी, नाल्यामधून वाहणारा मल इत्यादी समुद्रात जाण्यापासून रोखले गेले पाहिजे. कारखान्यातून निघणारे विष्युक्त पाणी पिऊन जलचर व उभयचर प्राण्यांची मृत्यू होते. दुसरी कडे त्याच प्रदूषित पाण्याला शेतात वापरले जाते. व दूषित पाण्यात उगवलेला भाजीपाला खाऊन आपले आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. म्हणून सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की जर आपल्या उदयाला आरोग्यदायी बनवायचे आहे तर आजपासून प्रयत्न करायला हवे.

     जल प्रदूषणानंतर वायू प्रदूषणाने पर्यावरणाला खूप हानी पोहोचवली आहे. मोठमोठ्या कारखान्यांच्या चिमण्यांमधून निघणारे धूर, रेल्वे व इतर पेट्रोल, डिझेल वर चालणारी वाहनांमधून निघणारा धूर वायु मंडळात मिसळून वातावरण प्रदूषित करतो. या शिवाय ध्वनी प्रदूषणाची समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे. आज लग्न तसेच इतर समारंभात मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. ज्यामुळे ध्वनी प्रदुषण होऊन बहिरेपणा व डोकेदुखी या समस्या निर्माण होतात.

     जगभरात 5 जून ला विश्व पर्यावरण दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक देशात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाची माहिती व सेमिनार आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी वृक्ष लागवड अभियान ही राबवले जाते. अशा पद्धतीने आपणही पर्यावरण संरक्षणात योगदान देऊन संपूर्ण मानव जातीची सहायता करू शकता.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.02.2023-सोमवार.
=========================================