काडी काडी गोवून, एक घरटं केलं

Started by chetan (टाकाऊ), September 17, 2010, 10:36:06 AM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

काडी काडी गोवून, एक घरटं  केलं
ऊन पाऊस वारा, सारं सहन केलं
पंख फुटले पाय, अलगद उडून गेले
आठवण म्हणून सवे, काळीजही नेलं     

किती उडलो झिजलो, बळ नाही शीणलं
सुखे निजाया त्यांना, मऊ अंथरुण विणलं   
आ वासल्या चोचींत, दाणा दाणा दिला
आता विचारतो मना, काय द्यायचं राहिलं

त्यांचं आभाळ त्यांना,दुरून खुणवत होतं
जणू ढगांच गलबत, जवळ बोलवत होतं       
भुर्रकन उडून गेले सारे, मागे पीस ठेऊन
काठी म्हणून जपलं पीस, तेही हरवून गेलं

                 माझा मित्र मकरंद केतकर                               







ghodekarbharati

खूप छान लिहितात मकरंद. अप्रतिम.