प्रियेच्या गूढ वागण्यावरली कविता-मी थांबण्यास तयार होतो, पण ती थांब म्हणत नव्हती

Started by Atul Kaviraje, February 28, 2023, 11:07:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रियेच्या गूढ वागण्यावरली कविता-गीत ऐकवितो. "मैं ये सोचकर उसके दर से उठा था, के वो रोक लेगी मना लेगी मुझको"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही मंगळवार-रजनी आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(मैं ये सोचकर उसके दर से उठा था, के वो रोक लेगी मना लेगी मुझको)
----------------------------------------------------------------------

                  "मी थांबण्यास तयार होतो, पण ती थांब म्हणत नव्हती !"
                 -------------------------------------------------

मी थांबण्यास तयार होतो
पण मला ती थांब म्हणत नव्हती !
उंबरठयावर पावले अडखळत होती माझी, 👣
दारावरून पावले निघत नव्हती माझी. 👣

मी थांबण्यास तयार होतो
पण मला ती थांब म्हणत नव्हती !
पाहून न पाहिल्यासारखे करीत होती,
थांब कधी म्हणते याची मी वाट पहात होतो.

वाऱ्यावर फडफडणारा पदर ती सावरत होती
भुरुभुरु उडणारे केश हाताने सांभाळत होती
हलकेच मान वेळावून माझ्याकडे पहात होती, 👀
पण मला ती थांब म्हणत नव्हती !

पावलांना तिच्या आता गती आली होती 👣
चालण्यात तिच्या आता एक वेगळाच थाट होता
तिला कळतं होत मी तिच्या मागोमागचं आहे,
पण मला ती थांब म्हणत नव्हती !

ती थांबलीच नव्हती, ती आता पाहतही नव्हती
ती आपल्याच नादात कुठेतरी पहात होती
मला माहित नव्हते, की ती मला टाळत होती ?
पण मला ती थांब म्हणत नव्हती !

तिने मला आवाजही दिला नव्हता
तिने मला पुकाराही दिला नव्हता
ती नक्कीच काहीतरी गुणगुणत होती,
पण मला ती थांब म्हणत नव्हती !

तिने मला हातही दिला नव्हता 🤞
तिने मला शेजारी बसविलेही नव्हते
ती बोलतही नव्हती, मला बोलवतही नव्हती,
पण मला ती थांबही म्हणत नव्हती !

मी अजूनही एका वेड्या आशेत होतो
मी अजूनही तेथेच घुटमळत होतो
उठत होतो, बसत होतो, पुन्हा तेच करत होतो,
तिच्या एका इशाऱ्याची मी प्रतीक्षा करत होतो.

मी तिच्याकडे मोठ्या आशेने पहात होतो
काहीतरी बोलण्याची अपेक्षा करत होतो
मला वाटलं ती मला म्हणेल, जाऊ नकोस,
मला वाटलं, आता तरी ती मला थांबवेल.

पण तसं काहीच घडलं नव्हतं
आणि आता काही घडणारही नव्हतं
माझं तिथे थांबणं वेळ वाया घालविण्यासारखं होतं,
आता मलाही तिथे थांबण्यात काहीही स्वारस्य नव्हतं.

आपल्याच धुंदीत ती मला विसरून गेली होती
आपल्याच विचारात ती गर्क होऊन गेली होती
शेवटी माझी पावले जाण्यासाठी वळली, 👣
तरीही ती मला थांब म्हणत नव्हती !

माझी पावले हळू हळू दूर चालली होती 👣
पण मन अजूनही मागे ओढत होतं
वाटलं म्हणेल, आता तरी थांब थोडा वेळ,
पण आता तर तिच्या हे गावीही नव्हतं. 

मग उदास मनाला मीच समजावीत राहिलो
हळूहळू तिच्या दारावरून परतू लागलो
आता तर मी इतका दूर होतो तिच्यापासून,
कधी नव्हे ते तिच्यापासून वेगळा होऊ लागलो.

शेवटपर्यंत ती थांब मला म्हणालीच नव्हती
तिने ती उत्सुकताच दाखवली नव्हती
एका तटस्थ भूमिकेतच ती वावरत होती,
त्या प्रेमाच्या अंकावर ती जणू पडदाचं पाडत होती.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.02.2023-मंगळवार.
=========================================