II भक्ती-गीत II-खंडोबा गीत-खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन

Started by Atul Kaviraje, March 01, 2023, 09:19:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II भक्ती-गीत II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार. आज ऐकुया एक खंडोबा गीत. या गीतIचे  बोल आहेत- "खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन"

                                      खंडोबा गीत 
                          "खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन"
                         --------------------------------------

असा कसा हा देव येडा झाला पहा कशी नवलाई
शिव अवतारी तुझीच पार्वती तीच हि बानू बाई
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा विजय असो

देव अधिपती कशी हरली त्याची मती
एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....

जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला
जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला
भुरळ पडली येडा झाला देव भुलूनी कसा गेला
होता तिचा पण आला पूर्ण तो करून
तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळीन
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....

बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात
बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात
राहून साऱ्या धनगरात खातोय भातामध्ये ताक
ध्यास होता मनी तिला वाचनात गुंतुनी
म्हणे होतो मी तुझा धनी जानी अंतरीच्या खुनी
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....

जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा
जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा
योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा
तोच आदीनाथ त्यांनी दावली जगी रीत
तीच आली कलियुगात सांगे साऱ्याला चंदन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....

देव अधिपती कशी हरली त्याची मती
एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....

=====================
Song  :- Khandobachi Karbharin
              Jhali Banu Dhangarin
Singer:- Parchi Sarve
Lyrics  :-Vasudev Fadke
=====================

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी भजन लैरिकस.को.इन)
                ---------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2023-बुधवार.
=========================================