सासरच्या अंगणात तू पाऊल ठेवतेस, आज माहेरचा उंबरठा कायमचाच ओलांडतेस !

Started by Atul Kaviraje, March 01, 2023, 10:40:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, लग्न झालेल्या मुलीच्या निरोपाची कविता-गीत ऐकवितो. "बाबुल की दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही बुधवार-रात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(बाबुल की दुआएँ लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले)
----------------------------------------------------------------

"सासरच्या अंगणात तू पाऊल ठेवतेस, आज माहेरचा उंबरठा कायमचाच ओलांडतेस !"  --------------------------------------------------------------------------

सासरच्या अंगणात तू पाऊल ठेवतेस, 👣
आज माहेरचा उंबरठा कायमचाच ओलांडतेस ! 
वडिलांचा आशीर्वाद घेऊन जा मुली,
माझ्यापासून आज तू वेगळी होतेस !

सासरच्या अंगणात तू पाऊल ठेवतेस, 👣
आज माहेरचा उंबरठा कायमचाच ओलांडतेस ! 
काळजाचाच माझ्या तू एक तुकडा आहेस,
आज माझं काळीज तोडून तू जातेस !

जा मुली, तू पाठी वळून नको पाहूस
या वडिलांच्या डोळ्यांतले अश्रू नको टिपूस 😢
शेवटी मुलगी असते परक्याचे धन,
अशी ताटकळत उभी नको राहूस.

अगं तुला इतकं मिळेल प्रेम सासरी
मग माहेरची आठवण का येईल तुला ?
पण एकदातरी आठवण कधी या वडिलांची,
मग अश्रू पुसत आठवत राहीन मी तुला. 😢

तळहाताच्या फोडाप्रमाणे मी जपलं तुला
तुला दुखलं, तरी दुःख होत होतं मला
काहीही कसर नाही सोडली, तुला वाढवलं,
काटे सहून, तुला फुलाप्रमाणे सांभाळलं. 🌹 🍀

हातांचा पाळणा केला तुला जोजवण्यासाठी
मांडीचा बिछाना केला तुला निजवण्यासाठी 
उन्हाच्या झळांपासून संरक्षिलं तुला,
पावसाच्या धारांपासून बचावलं तुला. ☔️

माझ्या बागेतली तू एक नाजूक कळीचं होतीस 🌹
तुझं पालन केलं, एका सुंदर फुलात तुला पाहिलं 🥀
तुला अशीच बहार मिळू दे, तू अशीच फुलत राहा,
तुला असाच संसार मिळालंIय, तू तिथेही उमलत राहा.

तू तिथे लक्ष्मीच्या पावलांनीच जाशील 👣
जिथे जाशील तिथे तू राज्यच करशील
भाग्य उजळेल त्या घराचे, लाडके,
ज्या घरात तुझी पावले पडतील. 👣

तू त्या घरास खळखळून हसवशील 😃
तुझ्यामुळे उदासी तेथे फिरकणारही नाही 😒
तू त्या घराचे सोनेच करशील,
ज्या घरी तुझे प्रसन्न हात फिरतील.

त्या घराचा दीपक नेहमीच प्रकाशमान राहील
त्या दिव्याची ज्योत सतत तेवतच राहील
त्या घराची भरभराटच होईल, उन्नती होईल,
जेथे तुझी पदकमळे उंबरठा ओलांडून जातील. 👣

तुला इथे माहेरी काही कमी पडले नाही
तुझा प्रत्येक शब्द मी झेलला, मुली
उन्हाचा चटका तुला बसू दिला नाही,
सतत तुझ्या माथ्यावर धरली प्रेमाची सावली.

तुझ्या वाटेवर मी पुष्प-दले अंथरली
पुष्प-कंटके मी स्वहस्ते दूर सारली
मार्गातले सारे अडथळे बाजूला केले,
डोळ्यांत तेल घालून मी तुला वाढवले.

या घरातून त्या घरातच जातेस तू
तुला तिथे तुझे सारेच मिळतील
येथली सर्व सुखे तुला तिथेही मिळतील,
दुःखे मग नावालाही नाही उरतील.

दोन्ही घरांना जोडणारा दुवा आहेस तू मुली
दोन्ही घरांना एक करणारा सांधा आहेस तू मुली
दोन्ही घरची लाज तुझ्याच हाती आहे,
दोन्ही घराचा विकास तुझ्याच हाती आहे.

आता डोळे पूस, या पित्याचे नाव राख 😢
आपल्या घराचेही तू नाव राख 👍
जा, दिल्या घरी तू सुखी राहा,
जा, तुझ्या संसारात तू आनंदी राहा.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2023-बुधवार.
=========================================