बाल्कनायझेशन्

Started by futsal25, September 17, 2010, 07:18:52 PM

Previous topic - Next topic

futsal25

युरोपात , बाल्कन प्रांति
होता, एक अखंड देश
भिन्न संस्कृति, भाषा, वेश
भिन्न धर्म, भिन्न अभिनिवेश
नाव त्याचे युगोस्लाविया

होते जरि एकवटलेले
नव्हती एकी, एकता
अनेक प्रश्न, तंटे
भाषा, धर्म, वंश
अनेक कारणे.......

राहिले सदैव भांडत
एकमेकांचे पाय ऒढत
फुटीरवादाची री ऒढत
भंगला, फुटला युगोस्लाविया
निर्मिले क्रोएशिया, मँसेडोनिया
स्लोवेनिया, बोस्निया, सर्बिया

एका अखंड देशाची,
झाली शकले सहा
आपण यातुन शिकुया
भारताचे बाल्कनायझेशन् टाळुया


- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  ???  ;)  :-X  ;D

astrocpt

खूपच छान...
उत्कृष्ट ... :)

प्रिया...

खरचं आपल्याला खूप गरज आहे यातून शिकायची... हातात हात घालून प्रगतीकडे जायचे का मुर्ख आणि स्वार्थी राजकारण्याच्या नादी लागून एकमेकांच्या टाळक्यात हाणायचे हे आपणच ठरवायचे...

rudra