ओळख नसलेल्या माणसाची कविता-गीत-मी इथे अनोळखीच राहिलो, मी साऱ्यांना परका झालो !

Started by Atul Kaviraje, March 04, 2023, 09:48:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, ओळख नसलेल्या माणसाची कविता-गीत ऐकवितो. "यहाँ मैं अजनबी हूँ, मैं जो हूँ बस वही हूँ"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही शनिवार-रात्र आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(यहाँ मैं अजनबी हूँ, मैं जो हूँ बस वही हूँ)
---------------------------------------------------

                   "मी इथे अनोळखीच राहिलो, मी साऱ्यांना परका झालो !"
                  -------------------------------------------------

मी इथे अनोळखीच राहिलो,
मी साऱ्यांना परका झालो !
नशिबाने दिले होते थोडे जरी,
आता त्या गोष्टींना मी पारखा झालो !

मी इथे अनोळखीच राहिलो,
मी साऱ्यांना परका झालो !
मी इथे कधी आलो होतो ?
त्या दृश्याना मी आठवत राहिलो !

तो काळच तसा होता, ती वेळ माझी होती
तो दिवस माझा होता, मला रात्रही राजी होती
सकाळ सायंकाळचे गणित मांडता मांडता,
ती जुनी आठवण आजही ताजी होती.

इथे माझ्या विचारांना कुणी विचारत नाही
इथे माझ्या मतांना कुणी मानत नाही
माझ्या सर्व भावना उदास आहेत, दुःखी आहेत, 😒
माझे सारे विचार आज जणू बदनामच आहेत.

गोष्टी खूपच बदलल्यात आज, विचारही  बदललेत
सभ्यता बदलल्यात, शिष्टाचारही बदललेत
परंतु मी तसाच आहे, अगदी खूप वर्षांपासून,
मी नाही बदललोय, तसा बऱ्याच काळापासून.

मी काय अन कसा कुणाला न्याय देणार ?
मी कुठे आणि किती कुणाला नीती शिकवणार ?
हातून कमी जास्त घडले, तर माफ करा लोकहो, 🙏
काही चूक झाली नकळत, तर क्षमा करा जनहो.

इथे मी त्रयस्थ आहे, अजनबीच आहे
इथे मी परका आहे, इथे मी तिसराच आहे
ओळख असूनही मी इथे अनोळखीच आहे,
लोकांनी तशीच माझी पारख केली आहे.

कालच केला होता तू माझ्याशी प्रेमालाप
आज बनून फिरत राहिलाय माझा अभिशाप
तू दुसऱ्यांची झालेली मला नाही पाहवणार,
माझ्या नजरेला हा नजारा नाही बघवणार.

हा जमान्याचा दस्तूर का असेल ?
हा दुनियेचा तौर तरीकI का असेल ?
तर तो मला मुळीच नाही मान्य,
मी एक माणूस आहे सर्व सामान्य.

आज माझ वतन मला पुकारतंय
आज माझा हिंदुस्थान मला बोलावतोय
माझ्या धमन्यात स्वतंत्रतेचे रक्त वाहतंय,
अन्यायाविरुद्ध ते डोकं वर काढतंय.

पण हे सारं तात्पुरतंच आहे, मित्रांनो
लोकांना माझं असं वर्तन नकोय, मित्रांनो
त्यानं मी इथे कधीच नको होतो, कधीच नकोय,
त्यांनी मला केव्हाच परका करून टाकलाय, मित्रांनो.

आज मला याचंच जास्त दुःख होतंय
तुलाही तुझ्या चुकीचे प्रायश्चित्त होतंय
हेच होत प्राक्तन आपलं, हेच होत नशीब,
कदाचित हेच वर्तन हे आपला बदला घेतंय.

पूर्व पश्चिम केव्हातरी मिळतील एकमेकाना
सूर्योदय सूर्यास्तही भेटतील केव्हातरी एकमेकांना
ज्याची बाग त्याचीच फुले असतील, 🥀
जिथे रुजतील, तिथेच ती फुलतील.

आज तुझा तो महालही मला ठेंगणा वाटतोय
राहून राहून माझ्या मनात विचार दाटतोय
तुझा महाल तुलाच होवो मुबारक,
माझ्या झोपडीचा दरवाजा माझी वाट पाहतोय.

शेवटी मी इथे अजनबीच ठरलोय
शेवटी मी इथे अनोळखीच उरलोय
मी होतो तसाच, मी आताही आहे, 👍
आतल्या आत माझे दुःख मी गिळून आहे. 🤔

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.03.2023-शनिवार.
=========================================