०४-मार्च-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, March 04, 2023, 10:10:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.०३.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "०४-मार्च-दिनविशेष"
                                  --------------------

-: दिनविशेष :-
०४ मार्च
औद्योगिक सुरक्षा दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण
१९९६
चित्रकार रवी परांजपे यांना 'कॅग हॉल ऑफ फेम' हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर
१९८०
प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
१९६१
१९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे 'आय. एन. एस. विक्रांत' असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.
१९५१
नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्‍घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.
१९३८
सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले.
१८६१
अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.
१७९१
व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९२२
दीना पाठक
दीना पाठक – अभिनेत्री, आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी १३० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.
(मृत्यू: ११ आक्टोबर २००२ - मुंबई)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.03.2023-शनिवार.
=========================================