मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-139-मोबाइल: श्राप की वरदान

Started by Atul Kaviraje, March 04, 2023, 10:30:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-139
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "मोबाइल: श्राप की वरदान"

     मित्रानो आजच्या आधुनिक युगात मोबाईल हा सर्वांची गरज बनला आहे. मोबाईल च्या मदतीने अनेक कार्य करणे सोपे झाले आहेत. मोबाईल चा सदुपयोग झाला तर मोबाईल एक वरदानच आहेत पण याचा दुरुपयोग करणाऱ्यांसाठी मोबाईल हा अभिशाप आहे. आजच्या या लेखात आपण मोबाईल श्राप की वरदान या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत.  तर चला मग सुरू करूया.

     आजचे युग मोबाईल शिवाय अपूर्ण आहे.‌ मनुष्याद्वारे केलेल्या शोधापैकी  मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आज एकविसाव्या शतकात मनुष्य मोबाईल शिवाय राहूच शकत नाही. दिवसाची सुरुवात मोबाईलच्या अलार्म ने होते. व्यवसाय, नातेवाईक आणि मित्रमंडळी च्या संपर्कात राहणे मोबाईल मुळे सोपे झाले आहे. आजकाल तरुणांमध्ये तर मोबाईल चे चलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा महत्वाच्या भाग बनला आहे. बाजारात देखील मोबाईलचे वेगवेगळी विशेषता आणि फीचर्स असणारे नवनवीन मॉडेल उपलब्ध आहेत आणि तरुणांमध्ये नवीन नवीन मॉडेल घेण्याचा क्रेझ देखील वाढतच आहे. म्हणून डोक्यात प्रश्न येतो की मोबाइल शाप आहे की वरदान?

     आज लहान लहान मुले देखील आपला अभ्यास पूर्ण झाल्यावर आई-वडिलांकडून गेम्स खेळायला मोबाईल मागतात. मोबाईल मुळे आपण कोणत्याही स्थानाच्या नकाशा मिळवू शकतो व  कोणाचीही मदत न घेता तेथे पोहचू शकतो. मोबाईल ही विज्ञानाची अमूल्य देण आहे. मोबाईल ने आपले जीवन सोपे बनवले आहे. मोबाईल मुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या लोकांशी गप्पा करू शकतो. व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमाने दूर असलेल्या नातेवाईकांना आपण जसेच्या तसे पाहू शकतो.

     मोबाईल मध्ये रेडिओ आणि mp3 प्लेयर सारखे फंक्शन्स असतात यांच्या मदतीने आपण गाणे व बातम्या ऐकू शकतो. मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर चे देखील फंक्शन असते म्हणून आता हिशोब करण्यासाठी सोबत मोठे कॅलकुलेटर सांभाळण्याची गरज नाही, मोबाईल च्या मदतीने आपण केव्हाही आणि कोठेही कॅल्क्युलेटर वापरू शकतो. आजकाल अनेक लोक मोबाईल मध्येच व्हिडिओ आणि मूव्हीज पाहतात. यासाठी ते यूट्यूब ॲप चा वापर करतात. थोडक्यात सांगायचे झाले तर मोबाईल ने संपूर्ण जगाला त्यात सामावून घेतले आहे. मोबाईल मध्ये असणाऱ्या कॅमेऱ्याद्वारे आपण सुंदर फोटो काढू शकतात, म्हणून आता बाहेर कुठेही फिरायला जाताना सोबत कॅमेरा नेण्याची आवश्यकता नाही. कारण मोबाईल द्वारे अतिशय चांगली फोटो काढणे सरल झाले आहे. मोबाइलच्या पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्याला सेल्फी कॅमेरा म्हटले जाते. या कॅमेर्‍याच्या मदतीने तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची फोटो काढू शकतात.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.03.2023-शनिवार.
=========================================